Todays horoscope 2nd August 2020 | आजचे राशीभविष्य- २ ऑगस्ट २०२०; 'या' राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक लाभ होण्याचे संकेत

आजचे राशीभविष्य- २ ऑगस्ट २०२०; 'या' राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक लाभ होण्याचे संकेत

मेष - हानिकारक विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. अन्यथा आळस आणि दुःख वाढेल. तब्येत यथा-तथाच राहील. आणखी वाचा 

वृषभ -  सरकार विरोधी कार्यापासून दूर राहण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. नवे कार्य हाती घेऊ नका. तब्येत बिघडेल. मनातही काळजी राहील. उक्ती आणि कृती यात संगती ठेवा. आणखी वाचा 

मिथुन - आजचा दिवस सुखासमाधानात जाईल. दैनंदिन कामात अडकून पडू नका. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. या आनंदात मित्र आणि संबंधितांना सहभागी करून घ्याल. आणखी वाचा 

कर्क - खूप मोठया आर्थिक लाभाची प्राप्ती होईल असे गणेशजी सांगत आहेत. व्यावसायिकांना दिवस लाभप्रद. कार्य साफल्यामुळे बढती आणि यशाची प्राप्ती होईल. आणखी वाचा 

सिंह - साहित्य आणि कलेविषयी गोडी वाटेल असे गणेशजी सांगतात. पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थ राहाल. दुपारनंतर आर्थिक अडचण दूर होईल. आणखी वाचा 

कन्या - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकविण्याकडे लक्ष द्या असा गणेशजींचा सल्ला आहे. आईची तब्बेत बिघडेल. स्वकीयांवर संकट ओढवेल. धनहानीचे योग आहेत. पाण्यापासून जपून राहा. आणखी वाचा 

तूळ - श्रीगणेश असा संकेत देतात की आजचा दिवस नवकार्य प्रारंभास अनुकूल आहे. आध्यात्म आणि गूढ रहस्यांकडे आकर्षण राहील. आणखी वाचा 

वृश्चिक - गणेशजी म्हणतात की कुटुंबातील व्यक्तींशी मने दुखावण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम ठेवा. कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मन द्विधा असेल. आणखी वाचा 

धनू - आज आपणाला आर्थिक लाभ होण्याचे संकेत गणेशजी देतात. कोणा स्नेह्याकडे मंगल कार्यानिमित्त जावे लागेल. धार्मिक स्थळी जाण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवनात सुख व आनंद मिळेल. आणखी वाचा 

मकर - कोर्टकचेरीत साक्ष न देण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. अस्वस्थ मन, शरीर- प्रकृतीवर दुष्परिणाम करणार नाही याकडे लक्ष दया. बोलणे आणि व्यवहार संयमाने करा. आणखी वाचा 

कुंभ - आजचा दिवस लाभदायक आहे असे गणेशजी सांगतात. आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. अपरिचितांशी परिचय होतील. परंतु दुपारनंतर तब्बेत बिघडेल. आणखी वाचा 

मीन - आज आपले विचार ठाम व पक्के नसतील असे गणेशजी सांगतात. वरिष्ठांकडून व्यवसायात लाभ होतील. पदोन्नती मिळेल. व्यापारविषयक नियोजन कराल. आणखी वाचा 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Todays horoscope 2nd August 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.