आजचे राशीभविष्य - 2 ऑगस्ट 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 08:03 IST2018-08-02T08:01:48+5:302018-08-02T08:03:05+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस?... जाणून घ्या

आजचे राशीभविष्य - 2 ऑगस्ट 2018
मेष
अत्यंत सावधपणे आजचा दिवस घालवा असा सल्ला श्रीगणेश देतात. सर्दी, खोकला आणि ताप यामुळे तब्बेत बिघडेल. स्वकीयांचा वियोग होईल. दानधर्म करण्यात धनाची लूट होण्याची परिस्थिती निर्माण होईल... आणखी वाचा
वृषभ
आज आपणावर श्रीगणेशाची पूर्ण कृपा राहील. परिवारात सुख आणि शांती राहील. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत आनंदात वेळ घालवाल. उत्पन्नात आणि व्यापार धंद्यात वाढ होईल... आणखी वाचा
मिथुन
श्रीगणेश कृपेने आज शारीरिक, मानसिक सुख चांगले मिळेल. नोकरी- व्यवसायात आपल्या कामाची प्रशंसा होईल. व्यापारी कामाची कदर करतील. त्यामुळे तुम्हाला जास्त प्रोत्साहन मिळेल... आणखी वाचा
कर्क
आज आपण धर्म, ध्यान, देवदर्शन यात जास्त वेळ घालवाल असे श्रीगणेश सांगतात. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग येईल. शारीरिक व मानसिकदृष्टया प्रसन्न राहाल. भाग्योदयाची संधी मिळेल... आणखी वाचा
सिंह
श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आजचा दिवस प्रतिकूलतांचा आहे. तब्बेतीकडे अधिक लक्ष पुरवावे लागेल. बाहेरचे खाणे- पिणे टाळा. आजारामुळे खर्च करावा लागेल... आणखी वाचा
कन्या
श्रीगणेश कृपेने आजचा आपला दिवस अनुकूलतापूर्ण राहील. जीवनसाथी बरोबर जवळीकेच्या क्षणांचा आनंद घ्याल. दांपत्यजीवनात गोडी राहील. भिन्न लिंगीय व्यक्तीचे आकर्षण वाटेल... आणखी वाचा
तूळ
घरात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील. कामात यश आणि सफलता मिळेल. तब्बेत चांगली राहील. आवश्यक कामांवरच खर्च होईल... आणखी वाचा
वृश्चिक
तब्बेती विषयी थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. शेअर- सट्टायात न पडण्याची सूचना श्रीगणेश देतात... आणखी वाचा
धनु
शरीर आणि मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आईशी मतभेद होईल किंवा तिच्या तब्बेतीसंबंधी चिंता राहील... आणखी वाचा
मकर
दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल. गृहस्थी जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल. व्यापार- धंद्यात आर्थिक लाभ होईल... आणखी वाचा
कुंभ
वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल असे श्रीगणेश सांगतात. वाद-विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा... आणखी वाचा
मीन
आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस चांगला आहे. नातलग, संबंधित आणि मित्र यांच्याशी भेट- संवाद घडतील... आणखी वाचा