शहरं
Join us  
Trending Stories
1
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
2
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
4
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
5
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
6
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
7
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
9
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
10
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
11
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
12
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
13
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
14
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
15
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
16
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
17
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
18
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
19
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
20
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - २९ सप्टेंबर २०२०; 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज प्रत्येक गोष्ट असेल अनुकूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 21:34 IST

जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस...

मेष - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस समाजकार्य आणि मित्रांसोबत धावपळीत जाईळ. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सरकारी कामात मात्र यश मिळेल. वडीलधारे आणि आदरणीय व्यक्तींची भेट होईल. अन्यत्र राहणार्‍या संततीकडून शुभ वार्ता मिळतील. आणखी वाचा

वृषभ -  श्रीगणेश कृपेने आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत पदोन्नती आणि उत्पन्न वाढीच्या वार्ता मिळतील. सरकारकडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुख- शांती मिळेल. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपला उत्साह वाढेल. अपूर्ण कामे तडीस जातील. आणखी वाचामिथुन - आज दिवसभरात थोडया प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल असे श्रीगणेश सांगतात. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. त्यामुळे नियोजित काम पूर्ण होणार नाही. मानसिक चिंता राहील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्‍यांचा मंद प्रतिसाद आपला उत्साहभंग करेल. आणखी वाचाकर्क - संताप आणि नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळे आज संयम राखणे आवश्यक आहे. खाण्या- पिण्याकडे लक्ष दिले नाही तर तब्बेत नक्कीच बिघडेल. कुटुंबात वादविवाद होतील. खर्चात वाढ झाल्याने आर्थिक चणचण भासेल. आाणखी वाचा

सिंह - श्रीगणेश सांगतात की आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पति- पत्नी दोधांपैकी एकाची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. परिणामतः प्रापंचिक गोष्टीपासून मन अलिप्त होईल. व्यापारीवर्गाने भागीदारांशी धैर्याने वागावे. सार्वजनिक जीवनात अपयश येणार नाही याची काळजी घ्या. आणखी वाचा

कन्या - आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख- शांती नांदेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. सुखदायक घटना घडतील. तब्बेत चांगली राहील. आजारी व्यक्तीच्या तब्बेतीत सुधारणा होईल. आर्थिक लाभ होतील. कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य लाभेल. आणखी वाचा

तूळ - तुमची कल्पना आणि सृजनशक्तीमुळे प्रगती होईल. त्यामुळे समाधान मिळेल. व्यर्थ वाद-विवादांमध्ये न पडण्याचा सल्ला श्रीगणेशजी देतात. आरोग्याच्या बाबतीत पचनाशी संबंधित समस्या जाणवतील. प्रिय व्यक्तीची सुखद भेट होईल.

वृश्चिक - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जाणवेल. वडीलधार्‍यांशी पटणार नाही त्यामुळे मनाला वेदना होतील. आईची तब्बेत बिघडू शकते. आर्थिक नुकसान व सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होईल. जमीन, वाहन इ. चे सौदे किंवा कागदपत्रे करण्याविषयी जपून राहण्याचा सल्ली श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा

धनु - गूढ रहस्यमय विद्या, अध्यात्माचा आपणावर विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास आणि संशोधन यांत गोडी राहील. मन शांत आणि प्रसन्न राहील. भावंडांशी सुसंवाद साधाल. आज नवे काम सुरू कराल. आप्तेष्ट आणि मित्रांच्या आगमनामुळे आपणाला आनंद वाटेल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. आणखी वाचा

मकर - श्रीगणेश सांगतात की संयमित बोलणे आपणाला अनेक संकटातून वाचवेल. म्हणून विचारपूर्वक बोला. कुटुंबातील सदस्यांशी गैरसमज झाल्याने मनसिक अस्वास्थ्य जाणवेल. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. शेअर सट्टा यांत पैसे गुंतविण्याचे नियोजन कराल. आणखी वाचा

कुंभ - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आणि उत्साहपूर्ण दिवसाचे संकेत श्रीगणेश देतात. आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस. आप्तेष्ट आणि मित्र यांच्यासह रुचकर आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या पर्यटनाचा बेत ठरवाल. आज आपणाला चिंतनशक्ती आणि आध्यात्मिक शक्तीचा प्रभाव जाणवेल. आणखी वाचा

मीन - आज आपल्या मनाची एकाग्रता राहील असे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे मानसिक व्यग्रता राहील. धार्मिक कार्यावर खर्च होईल. स्वकीयांपासून दूर जावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या कामात किंवा एखाद्याला जामीन राहण्याच्या बाबतीत खूप सावधपणे वागा असे श्रीगणेश सांगतात. वाणीतील असंयम भांडणे निर्माण करील. आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष