आजचे राशीभविष्य 29 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 07:12 IST2019-07-29T07:12:07+5:302019-07-29T07:12:38+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope 29 July 2019 | आजचे राशीभविष्य 29 जुलै 2019

आजचे राशीभविष्य 29 जुलै 2019

मेष - आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

वृषभ - महत्त्वाची कामे आज पूर्ण करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. धनलाभाची शक्यता. शारीरिक आणि मानसिक दृष्टी या उत्साही राहाल. आणखी वाचा

मिथुन - आज सांभाळून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. घरात कुटुंबीयांचा विरोध राहील. हाती घेतलेली कामे अपूर्ण राहतीलआणखी वाचा

कर्क - आज व्यापारात लाभाचे योग श्रीगणेश सांगतात. रम्य स्थळी सहलीचे बेत आखाल. दुपारनंतर मात्र शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आणखी वाचा

सिंह - नवीन कार्यारंभास आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कामे पूर्ण होतील. मित्र व स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. आणखी वाचा

कन्या - आपल्या व्यवसायात इतरांनापण धनलाभ होईल असे श्रीगणेश सांगतात. दूरच्या प्रवासाचे योग येतील. तब्बेत सांभाळून राहा.  आणखी वाचा

तूळ - आळस आणि जास्त कामाचा भार यामुळे मनाची व्याकुळता राहील. नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल. आणखी वाचा

वृश्चिक - सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत खाण्यापिण्याचा आनंद लुटाल. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस आनंदपूर्ण आणि उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल असे श्रीगणेश सांगतात. योजने प्रमाणे कामे पूर्ण होतील. आणखी वाचा

मकर -  कष्टाच्या मानाने फळ कमी मिळेल असे श्रीगणेश सांगतात. तरीही कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही.  आणखी वाचा

कुंभ - विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडू यांना आजचा दिवस चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. वडिलांकडून तसेच सरकार कडून लाभ होतील. खंबीर मनोबल असेल. आणखी वाचा

मीन - काल्पनिक विश्वात दिवस घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत खाण्या-पिण्याचे बेत कराल. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope 29 July 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.