todays horoscope 26th september 2020 | २६ सप्टेंबर राशीभविष्य- 'या' राशीच्या व्यक्तींसाठी दिवस त्रासाचा; कर्क राशीसाठी लाभच लाभ

२६ सप्टेंबर राशीभविष्य- 'या' राशीच्या व्यक्तींसाठी दिवस त्रासाचा; कर्क राशीसाठी लाभच लाभ

मेष
श्रीगणेश सांगतात की आज कुटुंबीयांसमवेत घरगुती बाबींचा महत्त्वपूर्ण विचार- विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी उच्चाधिकार्‍यां सोबत महत्त्वपूर्ण मुद्दयांवर विचार- विमर्श कराल. ऑफिसच्या कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आई आणि स्त्री वर्गाकडून लाभ संभवतो. आणखी वाचा

वृषभ
श्रीगणेश सांगतात की विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्याकडून बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल. परदेशी जाण्याची इच्छा असणार्‍या लोकांना अनुकूल योग आहेत. दूरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. आणखी वाचा

मिथुन
कोणत्याही प्रकारच्या आपत्तीपासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. शस्त्रकियेसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय आणि सहकारी यांच्याशी मतभेद होतील. त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा

कर्क
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस तुम्ही मौज- मजा आणि मनोरंजन यात गढून जाल. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत करमणूक केन्द्र किंवा पर्यटनस्थळी जाण्याची संधी मिळेल. स्वादिष्ट भोजन लाभेल. नवी वस्त्रे व अलंकार खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. सार्वजनिक क्षेत्रात मान मिळेल आणि व्यवसायात भागीदारीमध्ये लाभ मिळेल. आणखी वाचा

सिंह
श्रीगणेशांच्या मते आज घरात हर्ष आणि आनंदाचे वातावरण राहील. घरातील व्यक्तींबरोबर आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. यश, कीर्ती आणि आनंद लाभेल. नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील. व्याधीमुक्त व्हाल. आणखी वाचा

कन्या
आज आपणाला संतती समस्येमुळे चिंता राहील. अपचनासारख्या पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. बौद्धिक चर्चा आणि बोलाचालीत भागच घेऊ नका. प्रणयात सफलता मिळेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. आणखी वाचा

तूळ
भाग्योदय आणि धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा व्यावहारिक कामा निमित्त बाहेर जावे लागेल. जवळपासच्या धार्मिक स्थानी प्रवासाचा बेत आखाल. विदेशातून चांगल्या वार्ता येतील. आणखी वाचा

वृश्चिक
श्रीगणेश कृपेने आजचा दिवस खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वकीय आणि मित्रांशी सुसंवाद साधाल. जवळपासचे प्रवास होतील. सर्व कामे पूर्ण होतील. भाग्यात लाभदायक बदल होतील. आणखी वाचा

धनु
आपला आजचा दिवस मध्यम फलदायी सिद्ध होईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील सदस्यांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. आणखी वाचा

मकर
श्रीगणेश सांगतात की आजचा आपला दिवस ईश्वर नाम- स्मरणात जाईल. धार्मिक कार्यात मग्न राहाल. नोकरी व्यवसायात अनुकूल परिस्थिती असेल. प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होईल. मान सम्मान मिळेल. नोकरीत बढतीचे योग आहेत. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळतील, त्यामुळे आनंदी राहाल. गृहस्थी जीवनात आनंद होईल. आणखी वाचा

कुंभ
पैशाचे व्यवहार तसेच जमीन- जुमला अशा व्यवहारांमध्ये कोणाला जामीन राहू नका असे श्रीगणेश सुचवितात. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. अयोग्य जागी गुंतवणूक होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या निर्णयात स्वकीय सहमत होणार नाहीत. इतरांच्या बाबींत हस्तक्षेप करू नका. त्यामुळे नुकसान होईल. आणखी वाचा

मीन
मित्रांकडून आपणाला लाभ होईल आणि त्यांच्यावर खर्च करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र आणि वडीलधार्‍यांशी संपर्क होतील. एखाद्या रम्य स्थळी सहलीचे नियोजन कराल. नवे स्नेह-संबंध जुळतील आणि भविष्यात त्याच्यांकडून लाभ होईल. घरातून शुभवार्ता मिळतील. संततीकडून लाभ होईल. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: todays horoscope 26th september 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.