Todays Horoscope 26 February 2021 | राशीभविष्य- २६ फेब्रुवारी २०२१ : मकरसाठी आर्थिक चणचण भासेल, कुंभसाठी आनंदाचा दिवस असेल

राशीभविष्य- २६ फेब्रुवारी २०२१ : मकरसाठी आर्थिक चणचण भासेल, कुंभसाठी आनंदाचा दिवस असेल

मेष - भोवतालच्या स्वकीयांबरोबर उग्र चर्चा होणार नाही यावर लक्ष द्या. शारीरिक व मानसिक दृष्ट्या ग्रस्त राहाल. निद्रानाश झाल्यामुळे तब्बेत बिघडेल. आणखी वाचा  

वृषभ - आज भावनेच्या बंधनात गुंतण्याचा अनुभव घ्याल. कामे पूर्ण झाल्याने आनंदाचे प्रमाण वाढेल. भावंडांकडून लाभ होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताजेतवाने राहाल. आणखी वाचा  

मिथुन - नकारात्मक मानसिक व्यवहाराला पायबंद घाला. असंतोषाची भावना मनात वाढेल. कौटुंबिक वातावरणात ताळमेळ राहणार नाही. शारीरिक स्वास्थ्य पण मिळणार नाही. वाचन- लेखनात विद्यार्थ्यांचे मन लागणार नाही. आणखी वाचा  

कर्क - जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. आज आरोग्य चांगले राहील व मन ताजेतवाने राहील. दुपारनंतर मात्र मनात निराशेची भावना येऊन ते बेचैन राहील. आणखी वाचा  

सिंह - कोणताही अंतिम निर्णय घेण्याच्या स्थितीत आपण असणार नाही. म्हणून महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नये असे श्रीगणेश सुचवितात. कौटुंबिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. आणखी वाचा  

कन्या - आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी जाईल असे श्रीगणेश सांगतात. परिस्थिती अनुकूल राहील. शारीरिक व मानसिक शांती लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात वातावरण अनुकूल राहील. दुपारनंतर मनःस्थिती द्विधा होईल. आणखी वाचा  

तूळ - आज कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागाल. गृहसजावटीत बदल कराल. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य वाढेल. उच्चाधिकार्यांकडून व्यवसायात आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा  

वृश्चिक - परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या वार्ता येतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. धार्मिक हेतूने प्रवासाची शक्यता. धनलाभाची पण शक्यता. व्यवसायात बढतीचा योग आहे.  आणखी वाचा  

धनु - आज सकाळच्या वेळी शरीर प्रकृती ठीक नसेल. निषेधार्ह विचार मनःस्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम साधतील. सबब वैचारिक स्तरावर संयम राखणे आवश्यक. आर्थिक तंगी जाणवेल. दुपारनंतर मात्र शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य प्रफुल्लित होईल. आणखी वाचा  

मकर - आज कुटुंबीयांबरोबर आनंदपूर्वक प्रवासाचा अनुभव घ्याल. दुपारनंतर मात्र मन व्याकुळ होईल. अधिक खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. सरकारी कामात अडथळे येतील. आणखी वाचा  

कुंभ - आजचा आपला दिवस सुखाचा आणि शांततेचा जाईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. आनंदात राहाल आणि वाहनसुख मिळेल. आणखी वाचा  

मीन - आज विजातीय आकर्षणापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कोणाशीही बौद्धिक चर्चा अथवा वादविवाद करू नका. नवीन कार्य हाती घेऊ नका. दुपारनंतर स्थिती एकदम पालटेल.  आणखी वाचा 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Todays Horoscope 26 February 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.