Today's Horoscope - 24 February 2020 | आजचे राशीभविष्य - 24 फेब्रुवारी 2020

आजचे राशीभविष्य - 24 फेब्रुवारी 2020

मेष
आज मित्रांच्या संगतीमध्ये आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. तसेच तुम्हालाही त्यांच्यासाठी खर्च करावा लागे. आणखी वाचा

वृषभ
नोकरदारांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवकार्यारंभ यशस्वीरीत्या कराल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पदोन्नती पण मिळू शकेल.  आणखी वाचा

मिथुन
शरीरात थकवा आणि आळस असल्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटाच्या व्याधी त्रस्त करतील. आणखी वाचा

कर्क
प्रत्येक गोष्टीत आज जपून व्यवहार करा. कुटुंबातील व्यक्तींशी वादविवाद करू नका. वाणी आणि संतापावर संयम राखा. आणखी वाचा

सिंह
वैवाहिक जीवनात आपापसांतील कुरबुरीमुळे पत्नी व पती यांच्यात तणाव वाढेल. साथीदाराची तब्बेत बिघडेल. भागीदार आणि व्यापारी यांच्याशी शांतपणे व्यवहार करा. आणखी वाचा

कन्या
आज उत्साह आणि स्वास्थ्य अनुभवाल. घरात व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. रुग्णांची तब्बेत सुधारेल. आणखी वाचा

तूळ
आजचा दिवस मध्यम फलदायी जाईल. संततीची काळजी सतावेल. विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद-विवाद, बौद्धिक चर्चा यापासून दूर राहा. आज सुरू केलेले काम पूर्ण होणार नाही. आणखी वाचा

वृश्चिक
चिंताग्रस्त मन आणि अस्वस्थ शरीर आपणाला ग्रासून टाकेल. संबंधीतांशी मतभेद संभवतात.  आणखी वाचा

धनु
नवकार्यारंभास शुभ दिवस. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसमवेत प्रवासाचे बेत ठरवाल. तब्बेत चांगली राहील. भाग्योदय होईल. आणखी वाचा

मकर
आज घरातील व्यक्तींशी वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत याकडे लक्ष द्या. बोलण्यातील संयमच आपणाला संकटातून बाहेर काढेल. सट्टे बाजारात गुंतवणूक करण्याचे नियोजन कराल. आणखी वाचा

कुंभ
आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी सांगतात. शारीरिक आणि मानसिक दृष्टया आनंदी राहाल. भौतिक आणि आध्यात्मिक दृष्टीने अनुभव चांगले येतील. आणखी वाचा

मीन
अतिलोभ आणि हव्यास यात फसू नका. आर्थिक विषयात खूप सावध राहा. आर्थिक गुंतवणूक शिक्का, सही करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. तब्बेत बिघडू शकते. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - 24 February 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.