Today's horoscope - 23 April 2021 | आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२१ - तूळसाठी उत्पन्न वाढीचा योग तर वृश्चिकसाठी समाजात मान- प्रतिष्ठा मिळेल

आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२१ - तूळसाठी उत्पन्न वाढीचा योग तर वृश्चिकसाठी समाजात मान- प्रतिष्ठा मिळेल

मेष
स्वभावातील तापटपणा आणि हट्टी वागण्यावर नियंत्रण ठेवा असा सल्ला श्रीगणेश देतात. कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. शारीरिक कमजोरी जाणवेल. आणखी वाचा

वृषभ
आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल आणि खंबीर आत्मविश्वास यांची महत्त्वाची भूमिका राहील. वडील घराण्याकडून लाभ होईल. विद्यार्थिवर्गाची अभ्यासात गोडी लागेल. सरकारी कामात यश आणि फायदा मिळेल. आणखी वाचा

मिथुन
दिवसाच्या प्रारंभी उत्साह आणि स्फूर्ती जाणवेल. भाग्योदयाच्या संधी येतील. झटपट बदलणारे विचार तुम्हाला अडचणीत टाकतील. नवीन कामे सुरू करू शकाल. आणखी वाचा

कर्क
आज मनात निराशा असल्यामुळे खिन्नता अनुभवाल. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद व गैरसमज होतील. अहंपणा मुळे इतर कोणाच्या भावना दुखवाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर चित्त एकाग्र होणार नाही. आणखी वाचा

सिंह
आत्मविश्वास आणि झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. उक्ती आणि कृतीत उग्रपणा आणि कोणाशी अहंपणाने संघर्ष होण्याची शक्यता श्रीगणेश वर्तवितात. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. आणखी वाचा

कन्या
शारीरिक आणि मानसिक चिंता बेचैन करतील असे श्रीगणेश सांगतात. एखाद्याशी तंटाबखेडा होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल. अचानक धनखर्च होईल.  आणखी वाचा

तूळ
गृहस्थी जीवनात सुख आणि आनंद मिळेल. उत्पन्न वाढीचा योग आहे. कामाच्या जागी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. बढती मिळण्याचे संकेत आहेत. परिवारातील व्यक्ती आणि मित्रांच्या सहवासात खुश राहाल.  आणखी वाचा

वृश्चिक
आपली सर्व कामे यशस्वी पूर्ण होताना अनुभवाल. संसारात आनंदात आणि समाधानात राहील. समाजात मान- प्रतिष्ठा मिळेल. तब्बेत चांगली राहील. वरिष्ठ अधिकारी आणि वडीलधारे यांची मर्जी राहील.  आणखी वाचा

धनु
आज कोणतीही धोकेदायक चाल आपणाला अडचणीत टाकेल. कोणतेही काम करण्यात जोश- उत्साह वाटणार नाही. शारीरिक आणि मानसिक व्यग्रता राहील. वेळ काळजीत जाईल. नोकरीधंद्यात त्रास जाणवेल. आणखी वाचा

मकर
नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि खाण्या- पिण्याकडे चांगले लक्ष द्या असा सल्ला श्रीगणेश देत आहेत. अचानक खर्च वाढेल. औषधोपचारावर पैसा खर्च होईल. व्यापारात भागीदारांबरोबर अंतर्गत मतभेद वाढतील. आणखी वाचा

कुंभ
प्रणय, रोमान्स, प्रवास, पर्यटन, मनोरंजन आजच्या दिवसाचा भाग बनतील. मित्र व कुटुंबीयांसमवेत भोजनानिमित्त जाण्याचा योग येईल. उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्तीचे योग आहेत. भागीदारांशी चांगले संबंध राहतील. आणखी वाचा

मीन
दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील. घरात सुख शांती नांदेल. स्वभाव तापट राहील. उक्ती आणि कृती यात सांभाळून काम करण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. प्रतिस्पर्ध्यांना चित कराल. आणखी वाच

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope - 23 April 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.