आजचे राशीभविष्य - 22 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 07:24 IST2019-03-22T07:22:20+5:302019-03-22T07:24:50+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 22 मार्च 2019
मेष
आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या आजचा दिवस लाभदायक आहे. दीर्घकालीन आर्थिक नियोजन करू शकाल. व्यवसायात योजना आखाल. परोपकारी कार्यामुळे आपले मन प्रफुल्लित राहील. तब्बेत चांगली राहील... आणखी वाचा
वृषभ
परिश्रमाच्या तुलनेत अल्प मोबदला मिळेल तरीही आपण निष्ठेने कार्य पुढे न्याल. कामाचा व्याप आणि आपली मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व त्यातून लाभ होतील. मुदूभाषा नवीन संबंध स्थापित करण्यात मदत करेल... आणखी वाचा
मिथुन
आत्मंतिक भावनाशील मनाला संवेदनशील बनवेल. जलाशय आणि स्त्री वर्गापासून सावध राहा. मनःस्थिती दोलायमान राहिल्याने निर्णय शक्तीचा अभाव राहील. आईच्या तब्बेती विषयी काळजी राहील... आणखी वाचा
कर्क
आज कार्यसाफल्य आपली वाट पाहत आहे. त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. मन ताजेतवाने व प्रफुल्ल राहील. मित्र, आप्तेष्टांसोबत संवाद होतील व प्रवासाचा बेत ठरवाल... आणखी वाचा
सिंह
आजचा दिवस संमिश्र फलदायी जाईल. दीर्घकालीन नियोजनामुळे द्विधा अवस्था राहील. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. परिवारात सुसंवाद राहील. दूरस्थ स्नेही व मित्र यांच्याशी होणारी बोलणी लाभदायक ठरतील... आणखी वाचा
कन्या
आपली मधुर वाणी जिव्हाळ्याचे संबंध स्थापायला उपयोगी पडेल. वैचारिक भरभराट होईल. व्यापार धंद्यात लाभ व यश मिळेल. शारीरिक-मानसिक स्वास्थ्य लाभेल. मित्र व स्नेह्यांशी भेट व संवाद होतील... आणखी वाचा
तूळ
आज तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. मानसिक स्वास्थ्य पण कमी राहील. अविचारी आणि मनमानी व्यवहार संकटात टाकील. वाणीवर संयम ठेवा नाही तर कोणाशी भांडणतंटा होईल... आणखी वाचा
वृश्चिक
आज नोकरी- व्यवसायात लाभच लाभ आहेत. तसेच मित्र- आप्तेष्ट व वडीलघार्यांकडूनही लाभ मिळण्याचे संकेत आहेत. सामाजिक समारंभ, पर्यटन इ. साठी जाल. शरीर व मन खूपच प्रसन्न राहील. उत्पन्नाची साधने वाढतील... आणखी वाचा
धनु
आज यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा यात वाढ होईल. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वडील तसेच सरकारकडून फायदा मिळेल... आणखी वाचा
मकर
बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल... आणखी वाचा
कुंभ
आज निषेधात्मक आणि नकारात्मक विचारापासून दूर राहायला सांगतात. वाद, भांडणे यापासून दूर राहा. राग व बोलण्यावर संयम ठेवा. कौटुंबिक वातावरण कलुशित राहील. आर्थिक चणचण जाणवेल... आणखी वाचा
मीन
दैनंदिन कामातून बाहेर पडून आज तुम्ही सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ घालवाल. स्वजनांबररोबर पिकनिक साठीही जाऊ शकता. सिनेमा नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल... आणखी वाचा