Today's horoscope - 22 April 2021 | आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२१ - सिंहसाठी खर्चाचा अन् मिथुनसाठी लाभाचा दिवस

आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२१ - सिंहसाठी खर्चाचा अन् मिथुनसाठी लाभाचा दिवस

मेष
छातीत दुखणे किंवा अन्य आजार यामुळे चिंताग्रस्त राहाल. निरर्थक आर्थिक खर्च होणार नाहीत याची काळजी घ्या, तरीही मन अस्वस्थ राहील. आणखी वाचा

वृषभ
विरोधकावर मात कराल. सामाजिक क्षेत्रात मान-सम्मान मिळेल. परंतु दुपारनंतर संघर्षाचे वातावरण निर्माण होईल. आपली तरतरी आणि प्रेरणा निराशेत बदलेल. आणखी वाचा

मिथुन
शारीरिक व मानसिक ताणतणाव राहील. अनाठायी खर्च होईल. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळणार नाही. दुपारनंतर मात्र मित्र आणि स्नेही यांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. अर्थप्राप्ती चांगली होईल. आणखी वाचा

कर्क
आज आपण अधिक संवेदनशील बनाल. आज शारीरिक व मानसिक सुख चांगले मिळेल. मित्र व स्नेही यांच्या भेटीमुळे सुख वाटेल. दुपारनंतर मात्र कुटुंबातील व्यक्तींशी चर्चेत कटुता येईल. त्यामुळे मन दुःखी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

सिंह
संबंधितांचे मन दुखावण्याचे प्रसंग घडू शकतील. अपेक्षेपेक्षा खर्च अधिक होईल. मानसिक चिंतांचा त्याग करा. तब्बेतीकडे लक्ष द्या. दुपारनंतर वातावरण अनुकूल राहील.  आणखी वाचा

कन्या
व्यवसाय क्षेत्रात फायदा होईल. सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांसाठी केलेला खर्च फायदेशीर ठरेल. सहल प्रवासाचे योग. परंतु दुपारनंतर मनात अनिश्चितता राहील. संबन्धितान्शी मतभेद होतील, असे प्रसंग उद्भवतील. आणखी वाचा

तूळ
आजचा दिवस आपणांस खूप शुभ आहे. धार्मिक कार्य आणि देवदर्शनाचा लाभ होईल. विविध क्षेत्रांत लाभ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कामास प्रोत्साहन मिळेल. बढतीचे योग आहेत. मनातील इच्छा फळद्रूप होतील. आणखी वाचा

वृश्चिक
आजचा दिवस आपणांस खूपच शुभ आहे. धार्मिक यात्रा आणि देवदर्शनाचा लाभ होईल. विविध स्तरांवर लाभ होण्याची शक्यता आहे. परदेश गमनाच्या संधी उपलब्ध होतील. आणखी वाचा

धनु
मनात निराशा व मरगळ निर्माण होईल. कुटुंबीयांशी वादविवाद करू नका. दुपारनंतर शारीरिक आणि मानसिक स्थिति सुधारेल. कौटुंबिक समस्या कमी होतील. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. आणखी वाचा

मकर
मनोरंजना मुळे मन आनंदाने भरून जाईल. बागीदारीत फायदा होईल. प्रवासाच्या मधुर स्मृती मनात येतील. व्यापारी क्षेत्रात लाभ होईल. दुपारनंतर मात्र वातावरण प्रतिकूल राहील. आणखी वाचा

कुंभ
धंदा- व्यावसायिकांना दिवस अनुकूल राहील. शारीरिक आणि मानसिक दृष्टया आराम वाटेल. दिवसभर मनोरंजनामध्ये मग्न राहाल. आणखी वाचा

मीन
अस्वास्थ्य आणि उद्वेगाचा मनावर पगडा असेल. काही कारणास्तव अचानक खर्च करावा लागेल. तब्बेतीच्याही तक्रारी राहतील. दुपारनंतर मात्र घरात आनंद आणि शान्तता पसरेल. आणखी वाच

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope - 22 April 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.