आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 06:56 IST2019-09-21T06:56:21+5:302019-09-21T06:56:42+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या

आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2019
मेष - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर सुंदर भोजन करणे तसेच आनंदात वेळ घालवणे याचा योग येईल. आर्थिक बाबतीत भविष्या साठी चांगले प्लेनिंग करू शकाल. लक्ष्मीदेवीच्या कृपेने मिळकतीत वाढ होईल. आणखी वाचा
वृषभ - आजचा दिवस उत्साही आणि प्रसन्नतापूर्ण राहील. स्वास्थ्य चांगले असल्याने सुख आणि आनंद अनुभवाल. सगे-संबंधी किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. प्रवास आणि स्वादिष्ट भोजन दिवस आणखीच आनंदी बनवतील. आणखी वाचा
मिथुन - श्रीगणेशजी म्हणतात की संयमशील व विचारपूर्ण वर्तन आज तुम्हाला खूप अनिष्ट गोष्टीपासून वाचवील. आपल्या बोलाचालीतून गैरसमज पैदा होतील. शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील. कुटुंबात दुःखीकष्टी वातावरण राहील. आणखी वाचा
कर्क - अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे पाहता आजचा आपला दिवस अतिशय रोमांचक व आनंददायी जाईल असे श्रीगणेश सांगतात. मिळकतीत वाढ होईल. व्यापार्यांशी फायद्याचे सौदे होतील. मुलगा व पत्नी यांच्याकडून लाभ होईल. आणखी वाचा
सिंह - श्रीगणेश म्हणतात की तुमच्या कामात उशीरा यश मिळेल. ऑफिस किंवा घरात जबाबदार्यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल. नवीन संबंध स्थापित करणे किंवा कामासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेणे हे टाळा असा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा
कन्या - शरीरात थकवा, आळस आणि चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. ऑफिसात वरिष्ठांबरोबर आपला वाद होईल. राजनैतिक संकटांचा सामना करावा लागेल. आणखी वाचा
तूळ - स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. टाकून बोलणे किंवा खराब व्यवहार यामुळे वाद व भांडणे होतील. क्रोध, आणि कामवृत्ती यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. हितशत्रू सरसावतील. अचानक धनलाभ होईल. आणखी वाचा
वृश्चिक - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने नोकरी धंदा आणि व्यवसाय क्षेत्र यातून आज आपल्याला भरपूर लाभ होणार आहे. तसेच मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्याकडून ही लाभ होईल. सामाजिक समारोह, पर्यटन यासारख्या ठिकाणी जाल. आणखी वाचा
धनु - श्रीगणेश सांगतात की, आर्थिक आणि व्यावापारिक नियोजन करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. कार्ये यशस्वी होतील. परोपकाराची भावना आज बलवत्तर राहील. आनंदात आजचा दिवस व्यतित होईल. आणखी वाचा
मकर - श्रीगणेश म्हणतात की, आजचा आपला दिवस मिश्र फलदायी आहे. बौद्धिक कामे आणि व्यवसायात आज नवी विचार प्रणाली अमलात आणाल. लेखन आणि साहित्य क्षेत्रात तुमची सृजनात्मकता दिसेल. तरीही मनाच्या एका कोपर्यात अस्वस्थता जाणवेल. आणखी वाचा
कुंभ - नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. आज उद्वेग आणि क्रोध तुमच्या मनात जागा होईल. खर्च वाढेल. बोलण्यावर संयम न राहिल्याने घरात मतभेद व भांडणे होतील. स्वास्थ्य खराब होईल. दुर्घटनेपासून स्वतःला सांभाळा. आणखी वाचा
मीन - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा दिवस सुख शांतीत जाईल. व्यापार्यांना भागीदारीसाठी उत्तम वेळ आहे. पति-पत्नी मध्ये दाम्पत्यजीवनात निकटता येईल. मित्र, स्वजन यांच्या बरोबर भेटी होतील. रोमांस वाढेल. आणखी वाचा