आजचे राशीभविष्य - 20 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 07:41 IST2019-03-20T07:35:23+5:302019-03-20T07:41:43+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 20 मार्च 2019
मेष
स्वभावातील तापटपणा आणि हट्टी वागण्यावर नियंत्रण ठेवा कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. शारीरिक कमजोरी जाणवेल. यात्रा- प्रवास यासाठी काळ योग्य नाही... आणखी वाचा
वृषभ
आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल आणि खंबीर आत्मविश्वास यांची महत्त्वाची भूमिका राहील. वडील घराण्याकडून लाभ होईल. विद्यार्थिवर्गाची अभ्यासात गोडी लागेल. सरकारी कामात यश आणि फायदा मिळेल... आणखी वाचा
मिथुन
दिवसाच्या प्रारंभी उत्साह आणि स्फूर्ती जाणवेल. भाग्योदयाच्या संधी येतील. झटपट बदलणारे विचार तुम्हाला अडचणीत टाकतील. नवीन कामे सुरू करू शकाल. आपणाला लाभ होण्याचे योग आहेत... आणखी वाचा
कर्क
आज मनात निराशा असल्यामुळे खिन्नता अनुभवाल. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद व गैरसमज होतील. अहंपणा मुळे इतर कोणाच्या भावना दुखवाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर चित्त एकाग्र होणार नाही... आणखी वाचा
सिंह
आत्मविश्वास आणि झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. उक्ती आणि कृतीत उग्रपणा आणि कोणाशी अहंपणाने संघर्ष होण्याची शक्यता. वडीलधार्यांकडून लाभ होईल... आणखी वाचा
कन्या
शारीरिक आणि मानसिक चिंता बेचैन करतील. एखाद्याशी तंटाबखेडा होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल. अचानक धनखर्च होईल. दांपत्यजीवनात खटका उडेल... आणखी वाचा
तूळ
आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक व मानसिक दृष्ट्या तुम्ही आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांच्या भेटी, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल. गृहस्थजिवनात सुख- शांतीचा अनुभव येईल... आणखी वाचा
वृश्चिक
आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान- सन्मान उचांवेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. उच्चपदाधिकारी व वडिलधार्यांकडून फायदा होईल... आणखी वाचा
धनु
आज तब्बेत यथा तथा राहील. शारीरिक दृष्ट्या आळस आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता आणि व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. हानिकारक विचार दूर सारा... आणखी वाचा
मकर
खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केले तर तब्येत खराब होईल. आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल. नकारात्मक विचार आणि राग दूर ठेवल्यास संकटापासून वाचाल... आणखी वाचा
कुंभ
भरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल यासह प्रणय आणि रोमांस आजचा आपला दिवस रंगवून टाळतील. भिन्नलिंगी व्यक्तीसोबत परिचय वाढेल व मित्रता बनेल. जोडप्याला उत्तम वैवाहिक सुख मिळेल... आणखी वाचा
मीन
घरातील वातावरण सुख शांतीचे असल्यामुळे दैनंदीन कामे तुम्ही आत्मविश्वासपूर्वक चांगल्या प्रकारे कराल. आज आपल्याला संताप आणि बोलणे यावर संयम ठेवावा लागेल... आणखी वाचा