Todays Horoscope 20 February 2021 | राशीभविष्य- २० फेब्रुवारी २०२१; 'या' राशीच्या व्यक्ती कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही

राशीभविष्य- २० फेब्रुवारी २०२१; 'या' राशीच्या व्यक्ती कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही

मेष - श्रीगणेश आज आपल्याला आर्थिक बाबी आणि देणे-घेणे या मुद्दयांवर जागरूक राहायला सुचवतात. वादविवादापासून दूर राहा अन्यथा कुटुंबातील सदस्या बरोबर भांडणे होतील. आणखी वाचा  

वृषभ - श्रीगणेश कृपेने आपला आजचा दिवस फायद्याने भरलेला जाईल. शरीर व मनाने आज तुम्ही स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलात्मकता व सृजनात्मकता यांचा उपयोग कराल. आणखी वाचा  

मिथुन - आज आपण आपल्या बोलण्यावर व व्यवहारात सावधान राहा असे श्रीगणेश सांगतात. आपल्या बोलाचालीत काही गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. आपले स्वास्थ्य खराब असू शकेल. आणखी वाचा  

कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस तुम्हाला लाभदायक जाईल. नोकरी धंद्यात अनुकूल वातावरण असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषतः स्त्रीवर्गाकडून फायदा होईल. आणखी वाचा  

सिंह - आपल्या दृढ आत्मविश्वास व मनोबल याच्या मदतीने सगळी कामे यशस्वी कराल, असे श्रीगणेश सांगतात. व्यवसाय धंदयात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नतीचे योग येऊ शकतात. आणखी वाचा  

कन्या - श्रीगणेश म्हणतात की, आजचा आपला दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणार्‍या नातेवाईकांच्या वार्ता समजतील, त्यामुळे तुम्ही आनंदात असाल. आणखी वाचा  

तूळ - कोणत्याही नवीन कामाचा आज आरंभ न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आपले बोलणे आणि वर्तन नियंत्रणात ठेवा नाहीतर गैरसमज होऊ शकतात, ज्यामुळे नुकसान होऊ शकते. आणखी वाचा  

वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की आज आपण सगळा दिवस आनंद उल्हासात घालवाल. रोजच्या कामातून वेळ काढून स्वतःसाठी थोडा वेळ मिळवाल. मित्राबरोबर कुठे तरी प्रवासास जाल. आणखी वाचा  

धनू - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा आपला दिवस शुभ जाईल. स्वास्थ्य चांगले राहील. यश, कीर्ती, आनंद यांची प्राप्ती होईल. कुटुंबिया समवेत आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्धी आणि शत्रूवर विजय मिळवाल. आणखी वाचा  

मकर - आज आपण मनाने खूप अशांत व असमंजसपणाने राहाल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही, त्यामुळे तणावात राहाल. श्रीगणेश सल्ला देतात की कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय आज घेऊ नका. आणखी वाचा  

कुंभ - श्रीगणेश म्हणतात की अधिक संवेदनशील झाल्याने आपले मन बेचैन आणि अस्वस्थ होईल. जीद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. आणखी वाचा  

मीन - श्रीगणेश म्हणतात की महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आज शुभ दिवस आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक आणि कलात्मक शक्ती वाढेल. मित्र, परिवारासोबत प्रवासाला जाल. आणखी वाचा 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Todays Horoscope 20 February 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.