आजचं राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२१; नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल; अचानक धनलाभ होईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 07:13 IST2021-08-20T07:13:35+5:302021-08-20T07:13:59+5:30
Today's horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

आजचं राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२१; नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल; अचानक धनलाभ होईल
मेष - घर, कुटुंब आणि संतती यांच्या संबंधी आज आपणाला आनंद आणि संतोषाची भावना राहील. आज आप्त, इष्ट आणि मित्र आपणाला घेरून टाकतील. व्यापार- धंद्यासंबंधी प्रवास होईल आणि त्यात लाभ होईल. व्यवसायात लाभ, मान आणि प्रतिष्ठा मिळेल. आणखी वाचा
वृषभ - व्यापार्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्या वार्ता आपणाला भावविवश बनवतील. आणखी वाचा
मिथुन - अनियंत्रित रागाला लगाम घालण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. बदनामी आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबातील व्यक्ती आणि ऑफिसातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंग येतील. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौजमजेची साधने, उत्तम दागीने आणि वाहन खरेदी होईल. मौजमस्ती आणि मनोरंजनात वेळ खर्च होईल. तसेच भिन्न लिंगीय व्यक्तींशी रोमांचक मुलाखात तुम्हाला सुख देईल. आणखी वाचा
सिंह - श्रीगणेश सांगतात की उदासीन वृत्ती आणि संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील. आणखी वाचा
कन्या - चिंता आणि उद्विग्नपूर्ण असणारा आजचा दिवस या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती आणि तब्बेती विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील. आणखी वाचा
तूळ - श्रीगणेश सांगतात की आज आपण खूप भावनाशील बनाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या तब्बेतीची काळजी राहील. यात्रा- प्रवासासाठी काळ योग्य नाही. आणखी वाचा
वृश्चिक - कार्यात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयासाठी दिवस शुभ आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण आणि प्रेमाचे संबंध राहतील. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. प्रिय व्यक्तीच्या भेटीने मनाला आनंद वाटेल. आणखी वाचा
धनु - द्विधा मनःस्थिती आणि घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्त्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही असे श्रीगणेश सांगतात. घरातील व्यक्तींचे गैरसमज होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणखी वाचा
मकर - ईश्वर नामस्मरणाने दिवसाचा शुभारंभ होईल. धार्मिक कार्य, पूजा- पाठ होईल. गृहस्थी जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. मित्र आणि आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळतील. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या प्रसन्न राहाल. आणखी वाचा
कुंभ - कोणाला जामीन राहणे, पैसे देणे- घेणे करू नका असे श्रीगणेश सांगतात. खर्च वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता. कोणाशी गैरसमजाने भांडण होऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा
मीन - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारे आणि मित्रांकडून लाभ होईल. नवे मित्र मिळतील. त्यांची मैत्री भविष्यकाळात लाभदायक ठरेल. मंगलकार्यात हजेरी लावाल. अचानक धनलाभ होईल. आणखी वाचा