आजचे राशीभविष्य - 2 सप्टेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 07:25 IST2019-09-02T07:25:16+5:302019-09-02T07:25:50+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 2 सप्टेंबर 2019
मेष
दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल दिवस आहे. आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर दिवस आहे. शारीरिक आणि मानसिक उत्साह आज अनुभवाल. मित्र- स्वकीयांकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्याबरोबर आनंदात वेळ जाईल... आणखी वाचा
वृषभ
आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत होऊन तुम्हाला फायदा देईल तसेच मधुर व सौम्य भाषणाने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. शुभकार्य करण्याची प्रेरणा मिळेल. वाचन- लेखन या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल... आणखी वाचा
मिथुन
द्विधा अवस्थेतील आपले मन महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अधिकतम हळवेपणा तुमच्या दृढतेला कमजोर करेल. पाणी तसेच इतर प्रवाही पदार्थांपासून सावध राहा... आणखी वाचा
कर्क
शारीरिक आणि मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरणही आनंदी असेल. मित्र- स्नेहीजन यांच्या भेटी होतील. शुभ कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल. कामातील यश व प्रियव्यक्तीचा सहवास यामुळे आपण आनंदी राहाल... आणखी वाचा
सिंह
कुटुंबियासमवेत सुख शांती मध्ये दिवस घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्रीमित्रांकडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र आणि स्नेही यांच्याशी संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. मिळकतीपेक्षा खर्च जास्त होईल... आणखी वाचा
कन्या
आजच्या लाभदायक दिवसाने वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य आणि मधुरवाणी यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इ. प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील... आणखी वाचा
तूळ
आज थोडा सुद्धा असंयम व अनैतिक व्यवहार तुम्हाला अडचणीत आणेल. दुर्घटनेपासून सावध राहा. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरे यांच्याशी पटणार नाही. मनोरंजन तसेच फिरण्यात पैसे खर्च होतील... आणखी वाचा
वृश्चिक
नोकरी धंद्यात व व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांबरोबर गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहोत्सुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. पुत्र किंवा पत्नीकडून लाभ होईल. थोरले बंधू त्या लाभात निमित्तमात्र बनतील. स्नेही मित्र यांच्याकडून भेटवस्तू मिळतील... आणखी वाचा
धनु
आजच्या शुभ दिवसाचे संकेत.आज आपल्यात परोपकाराची भावना राहील. त्यामुळे इतरांना मदत करण्यात आपण उत्साही राहील. व्यापारात योग्य नियोजन राहील. व्यापारानिमित्त बाहेरचा प्रवास करावा लागेल. वरिष्ठ अधिकारी आपणावर खुश राहतील... आणखी वाचा
मकर
आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. बौद्धिक कार्य आणि लेखन कार्यात आज सक्रीय राहाल. साहित्य क्षेत्रात आणि लेखन कार्यातही आज सक्रीय राहाल. साहित्य क्षेत्रात नवनिर्मितीची योजना आखाल. तरीही मानसिक उदवेगामुळे आपण त्रस्त राहाल... आणखी वाचा
कुंभ
निषेधात्मक आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. विचार आपणाला त्रास देतील. त्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. राग जास्त वाढणार नाही याचा संयम बाळगा. अनैतिक कामांपासून दूर राहण्याचा सल्ला... आणखी वाचा
मीन
आजच्या या दिवशी आपण मनोरंजन आणि आनंदात दंग राहाल. कलाकार, लेखक इत्यांदीना आपली प्रतिभा प्रकट करण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारीसाठी चांगली वेळ आहे. स्वकीय आणि मित्रांसमवेत पर्यटनाचा आनंद लुटाल... आणखी वाचा