todays horoscope 19 november 2019 | आजचे राशीभविष्य - 19 नोव्हेंबर 2019

आजचे राशीभविष्य - 19 नोव्हेंबर 2019

मेष 

 

आज सावधागीरी बाळगण्याचा सल्ला आहे. कारण आज आपण अधिक हळवे आणि संवेदनशील बनाल. साध्या घटनांनी मनाला ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या तब्बेतीची काळजी लागून राहील. विद्यार्जनासाठी दिवस मध्यम फलदायी राहील... आणखी वाचा

वृषभ

आज आपल्या चिंता कमी होतील व उत्साह वाढेल. मन आनंदी राहील. जास्त भावूक आणि हळवे बनाल. आपली कल्पनाशक्ती विकसित होईल. त्यामुळे सृजनशील साहित्यरचना कराल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल... आणखी वाचा

मिथुन

मिश्रफलदायी दिवसाची शक्यता. आज थकवा, कार्यमग्नता आणि प्रसन्नाता यांचा संमिश्र अनुभव घ्याल. निर्धारित कामे पूर्ण कराल. धनप्राप्तीची योजना बारगळेल असे आधी वाटेल पण नंतर यश मिळेल असेही वाटेल... आणखी वाचा

कर्क

आज सर्वदृष्टीने आनंद देणारा दिवस आहे. शारीरिक व मानसिक दृष्ट्या स्वस्थ व आनंदी राहाल. आप्तेष्ट व कुटुंबीयांकडून सुख व आनंद मिळेल. त्यांच्याकडून काही भेटवस्तू मिळतील. प्रवास आणि खाण्यापिण्याचे चांगले बेत आखाल... आणखी वाचा

सिंह

संवेदनशीलतेवर संयम ठेवा असा सल्ला आज श्रीगणेश देत आहेत. आरोग्याची काळजी राहील. त्यामुळे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य बिघडेल. नाहक वादविवाद टाळा. कोर्ट- कचेरीतील कामे जपून करा... आणखी वाचा

कन्या

आज लाभदायक दिवसाची शक्यता. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील. धनप्राप्तीसाठी शुभ दिवस. मैत्रिणींकडून लाभाचे संकेत आहेत. प्रियव्यक्तींशी भेट आनंददायी राहील. व्यापारात धनवृद्धीची शक्यता... आणखी वाचा

तूळ

आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात व कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नोकरदारांना बढतीच्या संधी मिळतील. कौटुंबिक जीवनात आनंद व उत्साहाचे वातावरण असेल. गृहस्थी जीवनात गोडी राहील... आणखी वाचा

वृश्चिक

आज शारीरिक थकवा, आळस व मानसिक चिंता अनुभवाल असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात अडचणी येतील. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या तब्बेतीची काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद करू नका अनावश्यक खर्च वाढतील... आणखी वाचा

धनु

आज आपण खूप जपून राहा असा सल्ला. कोणतेही नवीन काम औषधोपचार सुरू करू नका. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे मनःस्थिती दुःखी राहील. पाण्यापासून जपा. उक्ती व कृती यांत संयम बाळगा. रागावर नियंत्रण ठेवा... आणखी वाचा

मकर 

विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल. दलाली, कमिशन, व्याज ई. मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. धनलाभाचे योग आहेत. संततीच्या अभ्यासाविषयी चिंता राहील. कामात यश मिळेल... आणखी वाचा

कुंभ

कार्य सिद्धीच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसमवेत वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगले राहील. तन-मन उत्साही व आनंदी असेल. भावनात्मक विचारांचा दिवस आहे... आणखी वाचा

मीन

आज आपण काल्पनिक जगात रमाल. विद्यार्जन करणार्‍यांना चमक दाखविता येईल. प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. पाण्यापासून जपा. स्वभाव सांभाळा... आणखी वाचा

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: todays horoscope 19 november 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.