आजचं राशीभविष्य- 19 जून 2021- भावना, संवेदनशीलतेच्या आहारी जाऊन स्त्रीवर्गाशी संबंध ठेऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 07:15 AM2021-06-19T07:15:29+5:302021-06-19T07:15:57+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Todays horoscope 19 June1 2021 | आजचं राशीभविष्य- 19 जून 2021- भावना, संवेदनशीलतेच्या आहारी जाऊन स्त्रीवर्गाशी संबंध ठेऊ नका

आजचं राशीभविष्य- 19 जून 2021- भावना, संवेदनशीलतेच्या आहारी जाऊन स्त्रीवर्गाशी संबंध ठेऊ नका

Next

मेष
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस परोपकार आणि सद्भावना यातच जाईल. सेवा- पुण्य यांची कामे हातून घडतील. मनाने खूप कामे ठरवलेली असतील. सत्कार्य हातून झाल्यामुळे शरीर व मनाला स्फूर्ती मिळेल. आणखी वाचा

वृषभ
श्रीगणेश सांगतात की आज तुम्हाला विदविवादात मोठे यश मिळेल. आपले बोलणे कोणाला मोहून टाकेल. तेच आपल्याला फायद्याचे ठरेल. त्यामुळे नवीन संबंधात सद्भाव वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाढेल. आणखी वाचा

मिथुन
भावना आणि संवेदनशीलता यांच्या आहारी जाऊन स्त्रीवर्गाशी संबंध न ठेवण्याचे श्रीगणेश सांगत आहेत. पाणी किंवा प्रवाही पदार्थापासून घात होऊ शकतो, म्हणून त्यापासून दूर राहा. काही आजारामुळे मन द्विधा बनेल व एखादा निर्णय घेण्यात बाधा येईल. आणखी वाचा

कर्क
आजचा दिवस प्रफुल्लतेने भरलेला असेल. नवीन कार्याची सुरूवातही आज करू शकता. मित्र- स्नेही भेटल्याने आनंद होईल. कामात मिळालेल्या यशामुळे आपला उत्साह वाढेल. प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. आणखी वाचा

सिंह
आजचा दिवस आपल्याला मिश्र फल देणारा आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. त्यांचे चांगले सहकार्य देखील मिळेल. आर्थिक क्षेत्रात मिळकतीपेक्षा खर्च अधिक होईल. आणखी वाचा

कन्या
श्रीगणेश सांगतात की आपण वाकचातुर्याने चांगले संबंध निर्माण कराल की जे भविष्यात उपयोगी व फायदयाचे ठरतील. वैचारिक समृद्धी वाढेल. शरीर, स्वास्थ्य आणि मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. आणखी वाचा

तूळ
आजचा दिवस आपणासाठी प्रतिकूल असल्यामुळे सावध राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आज तब्बेत बिघडेल. मानसिक दृष्टया पण अस्वास्थ्य जाणवेल. आपली उक्ती आणि कृती या मुळे कोणालाही भ्रांती होणार नाही याची सावधानता बाळगा. आणखी वाचा

वृश्चिक
आपणांस आजचा दिवस लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. आज मित्र भेटतील. आणि त्यांच्यासह हिंडण्या- फिरण्यात व मौजमजा करण्यात पैसा खर्च होईल. नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल. आणखी वाचा

धनु
कार्य साफल्याचा दिवस आहे. नवे काम सुरू कराल. व्यापारी आपल्या व्यवसायाचे नियोजन आणि विस्तार करू शकतील. मैत्रिणींकडून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी आपल्या बढतीचा विचार करतील. आणखी वाचा

मकर
श्रीगणेश सांगतात की बौद्धिक कार्य आणि व्यवसायात आपण नवी शैली वापराल. साहित्य व लेखन कार्याला गती मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. संततीची समस्या चिंता वाढवील. दूरचे प्रवास घडतील. आणखी वाचा

कुंभ
अनेकविध विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही यांकडे लक्ष द्या. चोरी, अनैतिक काम, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. आणखी वाचा

मीन
आज आपणातील लेखक किंवा कलाकाराची कला व्यक्त करण्याची संधी मिळेल असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात भागीदारी करण्यास शुभ दिवस. दैनंदिन कार्ये व्यवस्थित पार पाडल्याने दिवस आनंदात जाईल. आणखी वाच

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Todays horoscope 19 June1 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app