आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 07:00 IST2019-09-18T06:59:31+5:302019-09-18T07:00:02+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या

आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2019
मेष - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक काम उत्साह आणि आवेश यांनी पूर्णतः भरलेले असेल असा अनुभव येईल. शरीर व मन स्फूर्ती आणि टवटवीतपणाने भरेल. परिवारातील वातावरण चांगले राहील. मित्र आणि स्नेही यांच्यासोबत आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा
वृषभ - क्रोध आणि निराशेची भावना मनात पसरेल. तब्बेत साथ देणार नाही. घर-परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल. परिश्रम वाया जात आहेत असे वाटेल. आणखी वाचा
मिथुन -कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहील. नोकरी- व्यवसायात लाभाच्या वार्ता मिळतील. उच्च पदाधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील. विवाहयोग आहेत. स्त्री स्नेह्यांकडून विशेष लाभ होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता श्रीगणेशांना दिसते. आणखी वाचा
कर्क - नोकरी व्यवसायात उच्च पदस्थांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती याची बातमी म्हणजे आश्चर्य वाटायला नको. आई तसेच कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर खूप जवळीक राहील. आणखी वाचा
सिंह - श्रीगणेश सांगतात की स्वभावात उग्रता आणि संताप असल्यामुळे काम करण्यात आपले मन लागणार नाही. वादविवादात आपल्या अहंकारमुळे कोणाची नाराजी ओढवून घ्याल. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. उतावीळपणामुळे निर्णय घेणे किंवा वाटचाल करणे. आणखी वाचा
कन्या - श्रीगणेशांच्या दृष्टीने आज तुम्ही एखादे काम हाती घेणे हिताचे ठरणार नाही. बाहेरचे खाण्यामुळे तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरेल. पैसा जास्त खर्च होईल. हितशत्रूपासून सावध राहा. आणखी वाचा
तूळ - प्रणय, रोमान्स, मनोरंजन आणि मौज- मस्तीचा दिवस आहे. सार्वजनिक जीवनात महत्त्व मिळेल. यश आणि कीर्ती वाढेल. भागीदारांबरोबर लाभाच्या गोष्टी होतील. भारी वस्त्रे आणि अलंकार यांची खरेदी होईल. आणखी वाचा
वृश्चिक - श्रीगणेश म्हणतात की पारिवारिक शांतीचे वातावरण तुमच्या तनमनाल स्वस्थ ठेवील. ठरविलेल्या कामात यश मिळेल. नोकरीत सहकार्यांचे सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धा आणि शत्रूची चाल निष्फळ जाईल. मातेच्या घराण्याकडून लाभ होईल. आणखी वाचा
धनु - यात्रा- प्रवासाचा बेत स्थगित ठेवा असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. कार्यातील अपयश मनात निराशा निर्माण करील आणि त्यामुळे संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्याने गोष्टी जास्त चिघळणार नाहीत. पोटाच्या तक्रारीने हैराण व्हाल. आणखी वाचा
मकर - प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल असा इशारा श्रीगणेश देतात. घरगुती क्लेश मनाला यातना देतील. आईची तब्बेत मनात चिंता उत्पन्न करेल. सार्वजनिक जीवनात अपयश, अपकीर्ती होईल किंवा मान- प्रतिष्ठेची हानी होईल. आणखी वाचा
कुंभ - श्रीगणेश सांगतात की आज आपले मन मोकळेपणा अनुभवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. शेजारी आणि भावंडांशी अधिक मेळ जमेल. आणखी वाचा
मीन - जादा खर्च, संताप आणि जीभ यावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार आणि पैशाची देव-घेव याविषयी सावध राहा. घरातील लोकांशी भांडण होईल. आणखी वाचा