Todays Horoscope 16 February 2021 | राशीभविष्य- १६ फेब्रुवारी २०२१; 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम; मान-सन्मान मिळणार

राशीभविष्य- १६ फेब्रुवारी २०२१; 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम; मान-सन्मान मिळणार

मेष - आज दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल असे श्रीगणेश म्हणतात. शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. विनाकारण खर्च वाढतील. गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्या. आाणखी वाचा 

वृषभ -  श्रीगणेश म्हणतात की आजचा दिवस आनंदाचा आहे. व्यापार आणि आवक वाढणे यावर लक्ष्मीची कृपा राहील. कुटुंबीय व मित्र यांच्याबरोबर आनंदी वातावरण राहील. आणखी वाचा 

मिथुन - शरीर व मनाने दिवसभर प्रसन्नता राहील. व्यवसायात प्रशंसा झाल्याने कामातील उत्साह वाढेल. सहकार्‍यांकडून सहकार्य मिळेल. समाजात मान- सन्मान प्राप्त होईल. कुटुंबीयां बरोबर आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा 

कर्क - भाग्यात वृद्धी करणारा आजचा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. परदेशातून शुभ समाचार मिळतील. धार्मिक यात्रा किंवा छोटा प्रवास यामुळे प्रसन्नता वाढेल. शारीरिक स्वास्थ्याचा दिवस. मन प्रसन्न राहील. आणखी वाचा 

सिंह - आज तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी पैसाही खर्च होऊ शकतो. आज घरचेच खाणे पीणे ठेवा. ते अधिक फायदेशीर होईल. नकारात्मक विचार मनात राहतील, ते दूर करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा 

कन्या - आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. यश, कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. व्यापार धंद्यात भागीदारा बरोबरचे संबंध सकारात्मक राहतील. वस्त्र, आभुषणे खरेदी केल्याने खुशीत असाल. आणखी वाचा 

तूळ - श्रीगणेश सांगतात की आज तुमचे स्वास्थ्य चांगले राहील. व्यापारात लाभ होईल. सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. परिवारासोबत वेळ आनंदात घालवू शकाल. बोलण्यावर ताबा ठेवा. आणखी वाचा 

वृश्चिक - वाद विवादात अडकू नका असे श्रीगणेश सांगतात. संतती विषयी चिंता लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्याने त्यांचा उत्साह अधिकच वाढेल. शेअर्स व सट्टा यात धन खर्चू नका असा श्रीगणेश सल्ला देतात. आणखी वाचा

धनू - आज मन अनुत्साही असल्यामुळे मनात अशांती असेल. कुटुंबात वातावरण क्लेशदायक असेल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. स्थावर मिळकतीचे व्यवहार करताना जपून करावेत. आणखी वाचा

मकर - मित्र- परिवारासोबत आजचा दिवस आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्थावर मिळकती संबंधीची कामे आज करू शकाल. व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल दिवस. आणखी वाचा 

कुंभ - मानसिकदृष्ट्या द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास पडेल. निरर्थक खर्च होऊ देऊ नका. बोलण्यावर ताबा नसल्याने कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. आणखी वाचा 

मीन - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्रसन्नतापूर्ण असेल. वातावरण उत्साहपूर्ण असल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल. मित्र व कुटुंबीय यांच्याबरोबर प्रवासास जाणे होऊ शकते. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Todays Horoscope 16 February 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.