Today's horoscope - 15 July 2020, job promotion, profit in business, control anger | आजचे राशीभविष्य - १५ जुलै २०२०, नोकरीत बढती, व्यापारात लाभ, रागावर ठेवा नियंत्रण

आजचे राशीभविष्य - १५ जुलै २०२०, नोकरीत बढती, व्यापारात लाभ, रागावर ठेवा नियंत्रण

मेष - आजचा दिवस आपणासाठी शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीय, स्नेही आणि मित्रांसमवेत स्नेहसंमेलन समारंभाला उपस्थित राहाल. नवे कार्य हाती घेण्याचा उत्साह राहील.  आणखी वाचा

वृषभ -  शारीरिक व मानसिक दृष्ट्या आज व्यस्त राहाल. काळजीमुळे मनावर ताण राहील. त्यामुळे मन:स्वास्थ्य मिळणार नाही. कुटुंबीयांशी पण मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. आणखी वाचा 

मिथुन -  श्रीगणेश सांगतात की व्यापारी वर्गाला आजचा दिवस शुभफलदायी आहे. व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा 

कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. व्यापारी वर्गावर अधिकारी खुश राहतील. नोकरदारांना बढतीचे योग आहेत. परिवारात सलोख्याचे वातावरण राहील. आणखी वाचा 

सिंह - आळस आणि थकवा यात आजचा दिवस जाईल. उग्र स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. पोट दुखीने हैराण व्हाल. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. आणखी वाचा 

कन्या -  खाण्यापिण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या असा श्रीगणेशाचा सल्ला आहे. अति उत्साह आणि क्रोधाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. बोलण्यावर ही संयम ठेवा.  आणखी वाचा 

तूळ -  आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्‍या अर्थाने लुटाल. सामाजिक हेतूने कुटुंबीयांसमवेत बाहेर जावे लागेल. छोटया प्रवासाचा बेत आखाल. आणखी वाचा 

वृश्चिक -  सर्व दृष्टींनी आजचा दिवस सुखात जाईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात घालवाल.शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक प्रसन्नता अनुभवाल.  आणखी वाचा 

धनु -  श्रीगणेश आज आपणाला रागावर नियंत्रण ठेवायला सांगतात. पोटाच्या तक्रारी वाढतील. कोणत्याही कामात यश न मिळाल्याने निराशा येण्याची शक्यता.  आणखी वाचा

मकर - प्रतिकूलतेने भरलेला आजचा दिवस जाईल असे श्रीगणेश सांगतात. स्फूर्तीचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी तंटा बखेडा किंवा निरर्थक चर्चेचे प्रसंग येतील. आणखी वाचा 

कुंभ -  आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी होईल असे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे मानसिक प्रसन्नता लाभेल. तब्बेत पण चांगली राहील.  आणखी वाचा 

मीन - मनातून नकारात्मक विचार काढून टाका. रागावर आणि वाणीवर ताबा ठेवा.  आणखी वाचा 

English summary :
Today's horoscope - 15 July 2020

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope - 15 July 2020, job promotion, profit in business, control anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.