Todays Horoscope 14 February 2021 | राशीभविष्य- १४ फेब्रुवारी २०२१; 'या' राशीच्या विवाहोत्सुकांना मिळेल योग्य जोडीदार

राशीभविष्य- १४ फेब्रुवारी २०२१; 'या' राशीच्या विवाहोत्सुकांना मिळेल योग्य जोडीदार

मेष - आज आपणावर लक्ष्मीची कृपादृश्टी राहील असे गणेशजी सांगतात. विवाहोत्सुकांना योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धि मिळेल. व्यापारात लाभ होतील. आाणखी वाचा 

वृषभ -  सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्त व्हाल व गणेशजींचा आशीर्वाद आपणाला आहे. तब्येतही छान राहील. कौटुंबिक जीवनात सुख- समाधानचा अनुभव घ्याल. व्यवसाय धंद्यात यश मिळेल. आणखी वाचा 

मिथुन - संमिश्र फलदायी दिवस जाईल असे गणेशजी सांगतात. तब्बेतीत चढ-उतार होतील. व्यवसाय- नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी नाखूष राहतील, त्यामुळे त्रास होईल. खर्च वाढेल. संततीची काळजी राहील. आणखी वाचा 

कर्क - आज मन शांत आणि आनंदी राहण्यासाठी ईश्वराचा नाम जप आणि आध्यात्मिक वाचन हाच एकमेव उपाय असल्याचे गणेशजी सांगतात. रागाला आवर घाला. अनैतिक कृत्ये आणि नकारात्मक विचारापासून दूर राहा. आणखी वाचा 

सिंह - आरोग्याच्या दृष्टीने आज आपण प्रसन्न व आनंदित राहाल. मित्र आणि संबंधितांसोबत हिंडण्या- फिरण्याचा बेत आखून आनंददायी प्रवासही कराल. सामाजिक सन्मान मिळेल. भागीदारांबरोबर सकारात्मक चर्चा होईल. आणखी वाचा 

कन्या - स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील. यश आणि कीर्ती वाढेल. माहेरहून चांगल्या बातम्या मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रसन्नता जाणवेल. आणखी वाचा 

तूळ -आपण बौद्धिक शक्तीमुळे लेखन वा अन्य सृजनकार्य करण्यात आघाडीवर असाल असे श्रीगणेश सांगतात. विचारात सातत्यपूर्ण बदल झाल्याने मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. सबब यात्रा- प्रवास टाळावा. आणखी वाचा 

वृश्चिक - आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. स्वभावातील हट्टीपणा सोडून वागल्याने अनेक समस्या सुटतील. नवी वस्त्रे, अलंकार व सौंदर्य प्रसाधने यांवर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

धनू - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील असे श्रीगणेश सूचित करतात. घरातील सदस्यांसह प्रवास- पर्यटन कराल. मित्र आणि स्वकीयांसोबत वेळेचा सदुपयोग आनंदपूर्वक होईल. आणखी वाचा

मकर - श्रीगणेशांचा सल्ला आहे की अधिक वाद-विवाद न करणे आपल्या हिताचे आहे. धार्मिक कार्य आणि उपासनेसाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ नयेत यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा 

कुंभ - आज प्रापंचिक बाबीं ऐवजी आध्यात्मिक विषयांकडे आपला जास्त कल राहील. नकारात्मक भावनेला महत्त्व न देता. मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता दिवसभर राहील. आणखी वाचा 

मीन - पैशाची देवाण- घेवाण, जुनी येणी तसेच गुंतवणूक करताना सावध राहा. असा संकेत श्रीगणेश देत आहेत. इतरांच्या कामांत व्यत्यय आणू नका. कोर्ट- कचेरी प्रकरणात जपून राहा. वाणी आणि संतापावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Todays Horoscope 14 February 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.