राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२० - मानसिक दृष्ट्या शांतता लाभेल, मान-सन्मान वाढेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 07:06 IST2020-12-13T22:50:23+5:302020-12-14T07:06:12+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२० - मानसिक दृष्ट्या शांतता लाभेल, मान-सन्मान वाढेल
मेष
आजचा आपला दिवस आध्यात्मिक दृष्टीने वेगळा अनुभव देणारा ठरेल. गूढ आणि रहस्यमय विद्या आत्मसात करण्यात गोडी वाटेल. आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होण्याची शक्यता आहे. नवीन कामाचा आरंभ करण्यास दिवस चांगला नाही. आणखी वाचा
वृषभ
दाम्पत्यजीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाल आणि दिवस आनंदात घालवाल. स्नेह्यांसोबत उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आणखी वाचा
मिथुन
कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे. घरात सुखाचे आणि शांतीचे वातावरण राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आणखी वाचा
कर्क
अगदी शांत राहून आजचा दिवस घालवा. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. अचानक खर्च उद्भवतील. प्रेमिकांमध्ये वादविवाद होऊन मतभेद होतील. भिन्न लिंगीय व्यक्तीबद्दलचे आकर्षण संकटात टाकेल. आणखी वाचा
सिंह
आज परिवारात मतभिन्नतेचे वातावरण राहील. कुटुंबाशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. मनात नकारात्मक विचार येतील. त्यामुळे उदासीनता जाणवेल. जमीन, घर, वाहन इ. व्यवहार करताना हस्ताक्षर करण्यास दिवस चांगला नाही. आणखी वाचा
कन्या
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे अगदी भारावून जाल. भावंडांसमवेत वेळ आनंदात जाईल. त्यांच्याकडून लाभ पण होतील. प्रतिस्पर्ध्यांची चाल हाणून पाडाल. आणखी वाचा
तूळ
क्रोधावर नियंत्रण ठेवा. शक्यतो वाद टाळावेत. घरातील व्यक्तींशी एखाद्या विषयावर वादविवाद होतील. तब्बेत बिघडेल. विशेषतः डोळ्यांची निगा राखा. आणखी वाचा
वृश्चिक
आज कुटुंबात आनंदात दिवस घालवाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील. प्रिय व्यक्तींशी भेट सफल आणि आनंददायक ठरेल. एखादी शुभवार्ता मिळेल. स्नेही आणि मित्रवर्ग यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. आणखी वाचा
धनु
आजचा दिवस कष्टप्रद जाईल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध आणि आवेश राहील. त्यामुळे कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल. तब्बेत बिघडेल. बोलणे आणि वागणे यांवर संयम ठेवण्याची सूचना. आणखी वाचा
मकर
आजच्या लाभप्राद दिनी एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस शुभ आहे. शेअर- सट्टा या मध्ये धन लाभ होईल. मित्र आणि संबंधित यांच्याशी भेट झाल्याने आनंद वाटेल. आणखी वाचा
कुंभ
आपली सर्वकामे अगदी सरळपणे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल. नोकरी व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. मानसिक दृष्ट्या शांतता लाभेल. तब्बेत चांगली राहील. मान- सन्मान वाढेल. आणखी वाचा
मीन
आज शरीर आणि मन बेचैन राहील. संतती विषयक समस्या काळजीत टाकील. नोकरीत उच्च पदाधिकार्यांशी वादविवाद होतील आणि त्यांची नाराजी ओढवून घ्याल. प्रतिस्पर्धी खंबीर बनतील. आणखी वाचा