आजचे राशीभविष्य 13 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 07:04 IST2019-07-13T07:03:35+5:302019-07-13T07:04:17+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य 13 जुलै 2019
मेष
आज सांसारिक बाबींपासून दूर राहून आध्यात्मिक विषयात मग्न राहाल. त्यामध्ये गहन चिंतनशक्ती आपणाला मदत करेल. आणखी वाचा
वृषभ
कुटुंबीयांसमवेत सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल. व्यापार्यांना व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
मिथुन
आजचा दिवस फार चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. सुखाचे प्रसंग येतील. आणखी वाचा
कर्क
श्रीगणेश सांगतात की आज जरा दक्ष राहा. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. नवीन कार्यारंभाला अनुचित दिवस. आणखी वाचा
सिंह
श्रीगणेश सांगतात की आज आपला दिवस शुभफल देणारा नाही. घरात वाद होतील. कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की तुम्हाला दुःख होईल. आणखी वाचा
कन्या
कोणत्याही कामात विचार न करता भाग घेण्यास श्री गणेश तुम्हाला मना करताहेत. बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ चांगला जाईल. आणखी वाचा
तूळ
गणेशजी सांगतात की, आज आपली मनःस्थिती द्विधा होईल. निर्णय नक्की होत नाही असे झाल्याने नवीन कामे सुरू करू नका. आणखी वाचा
वृश्चिक
श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस साधारणच जाईल. तन-मनाला सुख- आनंद मिळेल. कुटुंबियां समवेत उत्साह व आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा
धनु
श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणासाठी समस्यापूर्ण राहील. कुटुंबीयांशी चर्चा होईल व दुःखी व्हाल. आणखी वाचा
मकर
मित्र आणि संबंधितांशी भेट झाल्याने दिवस आनंदात जाईल. सामाजिक क्षेत्र, व्यापार व इतर क्षेत्रातही आजचा दिवस आपणाला लाभदायक आहे. आणखी वाचा
कुंभ
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. आज प्रत्येक कामात सहज यश मिळेल. मनःस्थिती आनंदी राहील. आणखी वाचा
मीन
श्रीगणेश सांगतात की मनाचे अस्वास्थ्य तुम्हाला ग्रस्त ठेवेल. शरीरात थकवा व आळस जाणवेल. वरिष्ठांशी व्यवहार जपून करा. आणखी वाचा