todays horoscope 12 june 2019 | आजचे राशीभविष्य - 12 जून 2019
आजचे राशीभविष्य - 12 जून 2019

मेष

 

आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनांतून दिवस लाभदायी असेल. धनलाभाबरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल. व्यापार करीत असाल तर व्यापार विस्ताराची योजना तयार कराल. तन व मन एकदम ताजेतवाने राहील... आणखी वाचा

वृषभ 

वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळतील असे श्रीगणेश सांगतात. वैचारिक समृद्धी वाढेल आणि मन आनंदी रहील. शुभकार्याची प्रेरणा मिळेल. कष्टाच्या मानाने फळ कमी मिळेल. तरीही निश्चयपूर्वक पुढे जात राहाल... आणखी वाचा

मिथुन

आज आपल्या मनात विविध विचारतरंग उमटतील. त्या विचारांत गढून जाल. आज बौद्धिक कार्य कराल. पण वादविवादात पडू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. संवेदनशील राहाल. आई आणि स्त्रियांशी संबंधित विषयात हळवे बनाल... आणखी वाचा

कर्क 

आजचा दिवस शुभ आहे. नवीन कार्ये सुरू करायला दिवस चांगला. मित्र व नातलग भेटतील. प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल. आप्तेष्टांसमवेत पर्यटनाचे बेत आखाल. मनात प्रसन्नता राहील. आज केलेल्या कार्यात यश मिळण्याचे योग आहेत... आणखी वाचा

सिंह 

आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिक दृष्टिने लाभदायी ठरेल असे श्रीगणेश सांगतात. खर्च वाढतील. सर्वदूर असणार्‍या लोकांचे निरोप येतील आणि व्यवहारातून लाभ होतील. घरातील व्यक्तींकडून चांगले सहकार्य मिळेल... आणखी वाचा

कन्या 

आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी असेल. विचार समृद्ध होतील. आपल्या वाणीमुळे आपण फायदेशीर संबंध जुळवाल. व्यावसायिकदृष्ट्या दिवस लाभदायी. तब्बेत चांगली राहील. मन आनंदी असेल. आर्थिक लाभ होतील... आणखी वाचा

तूळ 

आपण आपल्या तब्बेतीकडे लक्ष देण्याची सूचना आहे. अविचारी वर्तन संकटात टाकेल. अशा व्यवहारांपासून जपा. दुर्घटनेपासून सावध राहा. खर्च वाढतील. व्यावसायिक व्यक्तींशी खटके उडतील. वाणीवर संयम ठेवा... आणखी वाचा

वृश्चिक

आजचा दिवस आपणाला लाभदायक ठरेल. नोकरी व्यवसायात फायदा होईल, मित्रांच्या गाठी पडतील आणि निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत ठरतील. विवाहोत्सुक व्यक्तींना योग्य जोडीदार मिळेल. पत्नी व मुलाकडून लाभ होईल... आणखी वाचा

धनु

शुभफलदायक दिवस राहील. गृहस्थी जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पिता आणि वडीलधार्‍यांकडून लाभाची शक्यता. व्यावसायिक क्षेत्रात प्रवास होईल. कामाचा व्याप वाढेल... आणखी वाचा

मकर 

अनुकूलता प्रतिकूलता असा संमिश्र फलदायक दिवस राहील. बौद्धिक कार्य आणि व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल. सृजनात्मक क्षेत्रात नवीन रचना क्षमतेचा परिचय करून द्याल. तरीही मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही... आणखी वाचा

कुंभ 

अनैतिक कृत्यांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. वाणीवर संयम ठेवा. त्यामुळे पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. प्रत्येक घटना व्यक्ती आणि वस्तू याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहाल. खर्च वाढल्याने धन संकट येईल... आणखी वाचा

मीन

दैनंदिन कामातून मोकळीक मिळून बाहेर हिंडण्या- फिरण्याला जाणे आणि मनोरंजनासाठी वेळ काढाल. कुटुंबातील व्यक्ती आणि मित्रांना पण त्यात समाविष्ट करून घ्याल. शारीरिक आमि मानसिकदृष्ट्या आज दिवसभर प्रफुल्लित राहाल... आणखी वाचा

 


Web Title: todays horoscope 12 june 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.