आजचे राशीभविष्य - 12 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 07:42 IST2019-02-12T07:38:26+5:302019-02-12T07:42:47+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 12 फेब्रुवारी 2019
मेष
आजचा दिवस आपल्याला पूर्ण अनुकूल आहे. सगळ्या कामात यश मिळाल्याने आपण खूप आनंदी व प्रसन्न असाल. आर्थिक क्षेत्रातही लाभ होईल... आणखी वाचा
वृषभ
आज सावधगिरीने राहण्याचा सल्ला. आपले मन अनेक प्रकारच्या चिंतांनी व्यग्र असेल. स्वास्थ्यही जरा नरमच राहील. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो... आणखी वाचा
मिथुन
आपला आजचा दिवस विविध लाभ प्राप्त करून देणारा ठरेल. कुटुंबात पत्नी आणि मुलांकडून फायदयाच्या बातम्या कळतील. मित्रांच्या भेटी आनंद देऊन जातील... आणखी वाचा
कर्क
नोकरी व्यवसाय करण्यार्यांना आजचा दिवस खूप लाभदायक आहे. नोकरीत पदाधिकारी तुमच्यावर खूश असतील त्यामुळे पदोन्नती होऊ शकते... आणखी वाचा
सिंह
आजचा दिवस मध्यम फल देणारा जाईल. धार्मिक आणि मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल. धार्मिक प्रवास ठरवाल. स्वास्थ्य साधारणच राहील... आणखी वाचा
कन्या
आज नवीन कामे सुरू करू नका. बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. मन रागीट बनेल. म्हणून बोलण्यावर ताबा ठेवा... आणखी वाचा
तूळ
आजचा संपूर्ण दिवस साफल्याचा व आनंदाचा असेल ज्यामुळे पूर्ण दिवस आनंदच अनुभवाल. सार्वजनिक जीवनासंबंधीच्या कार्यात सफलता मिळवाल... आणखी वाचा
वृश्चिक
सर्व दृष्टींनी आजचा दिवस सुखात जाईल. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात घालवाल. शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक प्रसन्नता अनुभवाल... आणखी वाचा
धनु
आजचा मिश्रफलदायी दिवस आहे. संततीचे स्वास्थ्य आणि अभ्यास यामुळे चिंतित राहाल. कार्य सफल न झाल्याने निर्माण होण्यार्या रागावर नियंत्रण ठेवा... आणखी वाचा
मकर
आजचा आपला दिवस प्रतिकूलतेने भरलेला आहे, त्यामुळे मन खिन्न राहील. शारीरिक स्फूर्ती, तरतरी यांचा अभाव राहील. छातीत दुखणे संभवते... आणखी वाचा
कुंभ
आज आपण तना-मनाने प्रसन्न असाल. मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदा बरोबर एकत्र येऊन नवीन योजना ठरवाल... आणखी वाचा
मीन
आज तुम्हाला बोलण्यावर संयम ठेवायला सांगतात. रागामुळे कोणाशी तक्रार किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील... आणखी वाचा