राशीभविष्य - ११ डिसेंबर २०२० - अकारण खर्च वाढेल, तब्येतीची काळजी राहील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 21:49 IST2020-12-10T21:34:22+5:302020-12-10T21:49:02+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

राशीभविष्य - ११ डिसेंबर २०२० - अकारण खर्च वाढेल, तब्येतीची काळजी राहील
मेष
सुखदायी दांपत्यजीवन, हिंडणे- फिरणे आणि सगळेच मनासारखे मिळण्याचे योग आहेत. आयात- निर्यात व्यापाराशी संबंधितांना लाभ आणि यश मिळेल. हरवलेली वस्तू परत मिळेल. आणखी वाचा
वृषभ
आजचा दिवस शुभ फलदायी ठरेल. ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. मातुल घराण्याकडून आनंदाच्या वार्ता मिळतील. आणखी वाचा
मिथुन
आज संतती आणि जीवनसाथी यांच्या तब्बेतीची काळजी राहील. वादविवाद, चर्चा यात खोलात जाऊ नका. आत्मसन्मान दुखावला जाईल. मैत्रिणींमुळे खर्च आणि नुकसान होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कर्क
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. छातीत दुखणे किंवा अन्य विकारामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण राहील. स्त्री वर्गाशी मतभेद वा भांडण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक जीवनात अपमान झाल्याने दुःख वाटेल. आणखी वाचा
सिंह
कार्यात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी आपल्या मनावर राहील. त्यामुळे प्रसन्न वाटेल. भावा- बहिणींबरोबर घरात काही बेत ठरवाल. मित्र, स्नेही यांच्यासोबत यात्रेचे योग आहेत. तब्बेत चांगली राहील. आणखी वाचा
कन्या
कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड वाणी आणि न्यायप्रिय व्यवहार यामुळे लोकप्रियता मिळेल. आर्थिक लाभ होतील. मिष्टान्न भोजन मिळेल. विद्यार्जनासाठी विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. आणखी वाचा
तूळ
क्रोधावर नियंत्रण ठेवा. शक्यतो वाद टाळावेत. घरातील व्यक्तींशी एखाद्या विषयावर वादविवाद होतील. तब्बेत बिघडेल. विशेषतः डोळ्यांची निगा राखा. आणखी वाचा
वृश्चिक
मनोरंजन, आनंद यासाठी पैसा खर्च होईल. चिंता व शारीरिक कष्ट यामुळे त्रासून जाल. अपघात व डॉक्टरी चिकित्सा यापासून सांभाळून राहा. गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. स्वभाव रागीट बनेल म्हणून भांडणापासून दूर राहा. आणखी वाचा
धनु
आर्थिक, सामाजीक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे. गृहस्थजीवनात पूर्णतः आनंद मिळेल. प्रेमाचा सुखद अनुभव येईल. मित्रांसोबत एखाद्या रम्य स्थळी फिरायला जावू शकाल. जीवनसाथीचा शोध घेणार्यांना विवाह योग आहेत. आणखी वाचा
मकर
आजचा दिवस संघर्षपूर्ण राहील. आज अग्नी, पाणी आणि वाहनांच्या दुर्घटनेपासून सावध राहा. व्यापारामुळे कार्यमग्न राहाल. व्यापारानिमित्त प्रवास करावा लागेल व त्याचा फायदा होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आणखी वाचा
कुंभ
आजचा दिवस मिश्रफलप्राप्तीचा. तब्बेत यथा- तथाच राहील. तरीही मनस्वास्थ्य चांगले राहील. कामाचा उत्साह कमी होईल. अधिकार्यांशी सांभाळून राहणे हिताचे. अकारण खर्च वाढेल. आनंद- सोहळा, प्रवास- पर्यटन यांवर पैसा खर्च होईल. आणखी वाचा
मीन
आजचा आपला दिवस मध्यम फळ देणारा जाईल. मानसिक, शारीरिक कष्ट अधिक होतील. अचानक धनलाभाचे योग. व्यापारी वर्गाला जुनी येणी वसूल होतील व पैसा मिळेल. तब्बेतीची काळजी घ्या. आणखी वाचा