राशीभविष्य - १० ऑक्टोबर २०२० - कुंभसाठी चिंतेचा अन् सिंहसाठी लाभाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 21:52 IST2020-10-09T21:43:43+5:302020-10-09T21:52:17+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - 10 october 2020 | राशीभविष्य - १० ऑक्टोबर २०२० - कुंभसाठी चिंतेचा अन् सिंहसाठी लाभाचा दिवस

राशीभविष्य - १० ऑक्टोबर २०२० - कुंभसाठी चिंतेचा अन् सिंहसाठी लाभाचा दिवस

मेष
नोकरी व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल. जवळपासच्या यात्रेचा योग येईल. भावंडांशी सलोखा राहील. त्याचा फायदा मिळेल. स्त्रियांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा

वृषभ
मनाची दोलायमान अवस्था महत्त्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. चर्चेत आपल्या फसव्या व्यवहारामुळे संघर्ष निर्माण होईल. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा

मिथुन
आजचा दिवस उत्साह आणि स्फूर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र आणि आप्तयांचा सहवास यांमुळे दिवस खूप आनंदात जाईल. दांपत्यजीवनात सुखा-समाधानाची भावना राहील. आर्थिक लाभ आणि नियोजन यासाठी अनुकूल दिवस.  आणखी वाचा

कर्क
परिवारात मतभेदाचे प्रसंग येतील. त्यामुळे मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. द्विधा मनःस्थिती राहील. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाका. कोणाशी गैरसमज किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने तब्बेत बिघडेल. आणखी वाचा

सिंह
आजचा दिवस आपणासाठी लाभदायक ठरेल, पण मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही याची दक्षता घ्या. स्त्री वर्गाशी मुलाकात होईल व ती लाभदायक ठरेल. वडिलधार्‍यांचे आशीर्वाद मिळतील. घरात मंगल कार्ये होतील. आणखी वाचा

कन्या
नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील. पित्या बद्दल आत्मीयता वाढेल. त्यांच्याकडून लाभ होईल. व्यापारी तथा नोकरदार आपल्या क्षेत्रांत पुढे जात राहतील. धन, मान- सन्मान वाढेल. सरकार कडून लाभ होईल.  आणखी वाचा

तूळ
नवीन कार्यारंभास शुभ दिवस दूरचा प्रवास, धार्मिक स्थळांना भेटीचा आज योग आहे. व्यवसाय धंद्यात फायदा. परदेशातील मित्रांचे समाचार मिळतील. सहकार्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्य सांभाळावे. संततीविषयी द्विधा मनःस्थिती राहील. आणखी वाचा

वृश्चिक
उक्ती आणि कृती यांवर आज संयम ठेवा. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आजारी पडण्याचा संभव आहे. खाणे- पिणे सांभाळा. अचानक धनलाभ होईल. आध्यात्मिक साधनेसाठी दिवस चांगला आहे. आणखी वाचा

धनु
पार्टी, पिकनिक, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. मनोरंजन विश्वात रमून जाल. भिन्न लिंगीय व्यक्तीशी रोमांचक मुलाकात होईल. दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल. सार्वजनिक सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. आणखी वाचा

मकर
वसुली तसेच पैशांच्या देवाण- घेवाणीत यश मिळेल. आयात- निर्यातीचा व्यापार करणार्‍यांना फायदा होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ होतील. कायदेशीर बाबींसंबंधी सावध राहाल. आणखी वाचा

कुंभ
मानसिक अशांतता आणि उद्विग्नता यांनी भरलेला दिवस आहे. सातत्याने विचार बदलत राहतील त्यामुळे निर्णायकता असणार नाही. ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संततीचे प्रश्न बेचैन करतील. पोटाच्या तक्रारी मुळे हैराण व्हाल.  आणखी वाचा

मीन
कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईची तब्बेत हा चिंतेचा विषय होईल. तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक उद्वेग, धनहानी आणि मानहानी होईल. नोकरीत समस्या उद्भवतील. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - 10 october 2020