आजचे राशीभविष्य - 10 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 07:46 IST2019-03-10T07:35:28+5:302019-03-10T07:46:55+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 10 मार्च 2019
मेष
स्फूर्ती आणि उत्साहपूर्ण दिवसाची सुरुवात कराल. घरात मित्र आणि सगेसोयरे यांच्या येण्याजाण्याने आनंदाचे वातावरण राहील. अचानक भेट तुम्हाला खूश करेल. आर्थिक फायदा मिळण्याची ही शक्यता आहे... आणखी वाचा
वृषभ
आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय सांभाळून घ्या. कोणाबरोबर गैरसमज होण्याची शक्यता आहे. तब्येत खराब असल्यामुळे मन उदास बनेल. परिवारात स्नेह्यांचा विरोध मतभेद निर्माण करेल... आणखी वाचा
मिथुन
सामाजिक, आर्थिक तसेच पारिवारिक क्षेत्रात लाभ होण्याचे संकेत. मित्रांकडून फायदाही होईल व त्यांच्यासाठी पैसेही खर्च होतील. जीवनसाथीच्या शोधात असाल तर त्यासाठी अनुकूल दिवस आहे... आणखी वाचा
कर्क
नोकरी व्यवसायात उच्च पदस्थांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती याची बातमी म्हणजे आश्चर्य वाटायला नको. कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर खूप जवळीक राहील... आणखी वाचा
सिंह
आळस, थकवा कामाचा वेग कमी करतील. पोटाच्या तक्रारीमुळे अस्वस्थता अनुभवाल. नोकरी व्यवसायात विघ्न संतोषी लोकांमुळे प्रगतीत अडथळा येईल. वरिष्ठापासून दूर राहण्यातच शहाणपण आहे... आणखी वाचा
कन्या
मनावर संयम' हा आजच्या दिवसाचा मंत्र बनवा, असा सल्ला आहे. स्वभावांतील उग्रता कोणा बरोबर मतभेद करण्याची शक्यता आहे. हितशत्रू विघ्न उपस्थित करतील. म्हणून जागरूक राहा... आणखी वाचा
तूळ
रोजच्या कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून तुम्ही पार्टी, सिनेमा किंवा पर्यटन याची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. भिन्नलिंगी व्यक्ती किंवा प्रियतमा यांच्या सान्निध्यामुळे खूप आनंद होईल... आणखी वाचा
वृश्चिक
आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या मुलाखती रद्द झाल्याने निराश व क्रोधीत बनाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल. मातुल घराकडून काही बातमी मिळाल्याने मन व्यथित होईल... आणखी वाचा
धनु
संततीच्या अभ्यास आणि स्वास्थ्य याविषयीच्या चिंतेने मन कष्टी राहील. पोटाच्या तक्रारी सतावतील. कामातील अपयशाने तुम्ही निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवा. साहित्य, लेखन आणि कला या विषयी रूची वाढेल... आणखी वाचा
मकर
उत्साह आणि स्फूर्ती यांचा अभाव असल्याने अस्वस्थता वाटेल. कुटुंबातील सदस्या बरोबर पटणार नाही किंवा तक्रार होईल ज्यामुळे मन खिन्न होईल. वेळेवर भोजन आणि शांत झोप हे मिळणार नाहीत... आणखी वाचा
कुंभ
आज आपण चिंतामुक्त होऊन जरा हायसे वाटेल. उत्साह वाढेल. वाडवडील व मित्र यांच्याकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता. स्नेहसंमेलन, प्रवासाच्या माध्यमातून स्वजनाबरोबर आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल... आणखी वाचा
मीन
आर्थिक नियोजन करण्यासाठी आज शुभ दिवस आहे. ठरविलेली कामे पूर्ण होतील. मिळकत वाढेल. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल. उत्कृष्ट भोजन मिळेल. स्वास्थ्य ठीक राहील... आणखी वाचा