राशीभविष्य - १० डिसेंबर २०२० - आर्थिक दृष्टिने लाभदायक, वैचारिक समृद्धी वाढेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 21:18 IST2020-12-09T21:17:59+5:302020-12-09T21:18:20+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

राशीभविष्य - १० डिसेंबर २०२० - आर्थिक दृष्टिने लाभदायक, वैचारिक समृद्धी वाढेल
मेष
आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनांतून दिवस लाभदायी असेल. धनलाभाबरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल. व्यापार करीत असाल तर व्यापार विस्ताराची योजना तयार कराल. आणखी वाचा
वृषभ
वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळतील. वैचारिक समृद्धी वाढेल आणि मन आनंदी राहील. शुभकार्याची प्रेरणा मिळेल. कष्टाच्या मानाने फळ कमी मिळेल. आणखी वाचा
मिथुन
आज आपल्या मनात विविध विचारतरंग उमटतील असे श्रीगणेश सांगतात. त्या विचारांत गढून जाल. आज बौद्धिक कार्य कराल. पण वादविवादात पडू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. संवेदनशील राहाल. आणखी वाचा
कर्क
आजचा दिवस शुभ आहे. नवीन कार्ये सुरू करायला दिवस चांगला. मित्र व नातलग भेटतील. प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल. आप्तेष्टांसमवेत पर्यटनाचे बेत आखाल. मनात प्रसन्नता राहील. आणखी वाचा
सिंह
आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिक दृष्टिने लाभदायी ठरेल असे श्रीगणेश सांगतात. खर्च वाढतील. सर्वदूर असणार्या लोकांचे निरोप येतील आणि व्यवहारातून लाभ होतील. घरातील व्यक्तींकडून चांगले सहकार्य मिळेल. आणखी वाचा
कन्या
आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी असेल. विचार समृद्ध होतील. आपल्या वाणीमुळे आपण फायदेशीर संबंध जुळवाल. व्यावसायिकदृष्ट्या दिवस लाभदायी. तब्बेत चांगली राहील. मन आनंदी असेल. आणखी वाचा
तूळ
क्रोधावर नियंत्रण ठेवा. शक्यतो वाद टाळावेत. घरातील व्यक्तींशी एखाद्या विषयावर वादविवाद होतील. तब्बेत बिघडेल. विशेषतः डोळ्यांची निगा राखा. आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस आपणाला लाभदायक ठरेल. नोकरी व्यवसायात फायदा होईल, मित्रांच्या गाठी पडतील आणि निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत ठरतील. विवाहोत्सुक व्यक्तींना योग्य जोडीदार मिळेल. आणखी वाचा
धनु
आज आपल्यात परोपकाराची भावना राहील. त्यामुळे इतरांना मदत करण्यात आपण उत्साही राहील. व्यापारात योग्य नियोजन राहील. व्यापारानिमित्त बाहेरचा प्रवास करावा लागेल. आणखी वाचा
मकर
आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. बौद्धिक कार्य आणि लेखन कार्यात आज सक्रीय राहाल. साहित्य क्षेत्रात आणि लेखन कार्यातही आज सक्रीय राहाल. साहित्य क्षेत्रात नवनिर्मितीची योजना आखाल. तरीही मानसिक उदवेगामुळे आपण त्रस्त राहाल. आणखी वाचा
कुंभ
अनैतिक, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खूप विचार आणि संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल. तब्बेत बिघडेल. कुटुंबात खडाजंगी होईल. आणखी वाचा
मीन
व्यापार्यांना उज्ज्वल भविष्य आहे. भागीदारीसाठी चांगली वेळ आहे. साहित्यिक, कलाकार, कारागिर आपल्या कलेला वाव देऊ शकतील. आदर मिळेल. आणखी वाचा