आजचे राशीभविष्य - 1 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 07:43 IST2019-09-01T07:40:38+5:302019-09-01T07:43:18+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

todays horoscope 1 september 2019 | आजचे राशीभविष्य - 1 सप्टेंबर 2019

आजचे राशीभविष्य - 1 सप्टेंबर 2019

मेष

 

आजचा दिवस आनंददायक राहील असे श्रीगणेश सांगतात. लक्ष्मी प्रसन्न झाल्यास आर्थिक योजना पूर्ण होतील. व्यावसायिक क्षेत्रात कार्य घडेल. क्षेत्राबाहेरील लोकांशीपण संपर्क येईल. बौद्धिक कार्यात रुची वाढेल. जवळपासचे प्रवास घडतील... आणखी वाचा

वृषभ 

वैचारिक पातळीवर थोरपणा आणि गोड वाणी यांमुळे इतरांवर प्रभाव पडेल. तसेच त्यांच्याशी संबंधामध्ये सुसंवाद निर्माण होतील. बैठका, चर्चा यातही आपणाला यश मिळेल. कष्टाचे अपेक्षित फळ न मिळूनही आपण त्या क्षेत्रात प्रगती पथावर राहाल... आणखी वाचा

मिथुन

आज मनाची स्थिती दोलायमान राहील असे श्रीगणेश सांगतात. मन द्विधा बनेल. जादा हळवेपणा मनाला बेचैन करेल. आईविषयी अधिक भावनाशील राहाल. बौद्धिक चर्चेचे प्रसंग येतील पण वादविवाद टाळा... आणखी वाचा

कर्क

भावांकडून आज लाभ होईल. मित्रांची भेट आणि स्वकीयांचा सहवास याचा आनंद लाभेल. रम्य स्थळी प्रवासाला जाण्याची शक्यता. प्रत्येक कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. भावनेला प्राधान्य दिल्याने संबंध सुखदायक राहतील... आणखी वाचा

सिंह 

विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल. तरीही कुटुंबीयांसमवेत चांगले वातावरण राहील्याने आपली प्रसन्नता वाढेल. दूरस्थ व्यक्ती किंवा संस्था यांच्याबरोबरचे संबंध दृढ होतील की ज्यामुळे भविष्यात फायदा होईल... आणखी वाचा

कन्या

आजचा दिवस फारच आनंदात जाईल.  शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही आणि प्रसन्न राहाल. लक्ष्मीची कृपादृष्टी राहील. मित्र आणि स्नेह्यांची भेट आनददायक राहील... आणखी वाचा

तूळ

क्रोधावर नियंत्रण ठेवा. शक्यतो वाद टाळावेत. घरातील व्यक्तींशी एखाद्या विषयावर वादविवाद होतील. तब्बेत बिघडेल. विशेषतः डोळ्यांची निगा राखा. अपघाताची शक्यता. कोर्ट कचेरीच्या प्रकरणात लक्ष द्या. मानहानी होऊ नये यासाठी दक्षता घ्या... आणखी वाचा

वृश्चिक 

आजचा दिवस आपणाला लाभदायक आणि शुभफल प्राप्तीचा ठरेल. सांसारिक सुख मिळेल. विवाहोत्सुकांना विवाहयोग आहेत. व्यवसायात विशेष लाभ होतील. वरिष्ठ अधिकारी आपल्यावर संतुष्ट राहतील. मित्र भेटतील... आणखी वाचा

धनु

कार्य साफल्याचा दिवस आहे. नवे काम सुरू कराल. व्यापारी आपल्या व्यवसायाचे नियोजन आणि विस्तार करू शकतील. मैत्रिणींकडून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी आपल्या बढतीचा विचार करतील. गृहजीवनात आनंद व समाधान मिळेल... आणखी वाचा

मकर 

बौद्धिक कार्य आणि व्यवसायात आपण नवी शैली वापराल. साहित्य व लेखन कार्याला गती मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. संततीची समस्या चिंता वाढवील. दूरचे प्रवास घडतील... आणखी वाचा

कुंभ

अनैतिक, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला. खूप विचार आणि संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल. तब्बेत बिघडेल. कुटुंबात खडाजंगी होईल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चणचण भासेल... आणखी वाचा

मीन 

व्यापार्‍यांना उज्ज्वल भविष्य आहे. भागीदारीसाठी चांगली वेळ आहे. साहित्यिक, कलाकार, कारागिर आपल्या कलेला वाव देऊ शकतील. आदर मिळेल. पार्टी, सहल यांतून मनोरंजन होईल. दांपत्यजीवनाचा भरपूर आनंद मिळेल... आणखी वाचा

 

Web Title: todays horoscope 1 september 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.