Today's Horoscope - 1 April 2020 | आजचे राशीभविष्य - 1 एप्रिल 2020

आजचे राशीभविष्य - 1 एप्रिल 2020

मेष
आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी आहे. नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळेल व नवीन कार्याचा आरंभ कराल. मनात शीघ्र बदल होतील व मन द्विधा बनेल. आणखी वाचा

वृषभ
विचारांत व्यस्त राहाल. त्यामुळे कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. एखादे नवीन काम सुरू करणे हितावह नाही. आणखी वाचा

मिथुन
आज आपल्या दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन आणि स्वस्थचित्ताने होईल. मित्र आणि नातलगांसोबत सहभोजनाचा आनंद लुटाल. सुंदर वस्त्रे परिधान कराल.  आणखी वाचा

कर्क
मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कोणताही अंतिम निर्णय घेऊ शकणार नाही. असमंजसपणामुळे मनाला यातना होतील. संबंधितांचे गैरसमज होतील. कौटुंबिक बाबींवर खर्च होईल. आणखी वाचा

सिंह
आजचा दिवस फार चांगला जाईल. तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी गमावाल. मन विचारात गढून जाईल. नवे कार्य हाती घेऊ नका.  आणखी वाचा

कन्या
आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. नवीन कार्ये आज सफल होतील. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी फायद्याचा दिवस. त्यांना पदोन्नती मिळू शकते. आणखी वाचा

तूळ
नवीन कार्यारंभास शुभ दिवस दूरचा प्रवास, धार्मिक स्थळांना भेटीचा आज योग आहे. व्यवसाय धंद्यात फायदा. परदेशातील मित्रांचे समाचार मिळतील. सहकार्यांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा

वृश्चिक
नवीन कार्याची सुरुवात करु नका. तसेच रागावर नियंत्रण ठेवा. अनैतिक कामकृत्या पासून दूर राहा. राजकीय गुन्ह्यापासून दूर राहा.  आणखी वाचा

धनु
मनोरंजन, पार्टी, पिकनिक, प्रवास, सुग्रास भोजन व सुंदर वस्त्र प्रावरणेही आजच्या दिवसाची विशेषता असेल.. आणखी वाचा

मकर
पैशाचे व्यवहार सहज होतील. घरातील वातावरण आनंदी असेल. आवश्यक ठिकाणीच पैसा खर्च होईल. नोकरीत सहकार्यांकडून सहकार्य मिळेल. आणखी वाचा

कुंभ
आज विचारात बदल दिसून येईल. महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा. प्रवास शक्यतो टाळावेत. संतती विषयी काळजी राहील. आणखी वाचा

मीन
कुटुंबात वादविवाद होतील. आईचे स्वास्थ्य बिघडून चिंता निर्माण होईल. मन नाराज राहील. स्वास्थ्य बिघडल्याने झोप लागणार नाही. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - 1 April 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.