Todays Horoscope 01 March 2021 | राशीभविष्य- ०१ मार्च २०२१ : धनुसाठी प्रत्येक कामात यश मिळेल तर कुंभसाठी मानसिक थकवा जाणवेल

राशीभविष्य- ०१ मार्च २०२१ : धनुसाठी प्रत्येक कामात यश मिळेल तर कुंभसाठी मानसिक थकवा जाणवेल

मेष - आजचा दिवस आनंददायक राहील असे श्रीगणेश सांगतात. लक्ष्मी प्रसन्न झाल्यास आर्थिक योजना पूर्ण होतील. व्यावसायिक क्षेत्रात कार्य घडेल. जनसंपर्क वाढेल. क्षेत्राबाहेरील लोकांशीपण संपर्क येईल. आणखी वाचा  

वृषभ - वैचारिक पातळीवर थोरपणा आणि गोड वाणी यांमुळे इतरांवर प्रभाव पडेल. तसेच त्यांच्याशी संबंधामध्ये सुसंवाद निर्माण होतील. बैठका, चर्चा यातही आपणाला यश मिळेल. आणखी वाचा  

मिथुन - आज मनाची स्थिती दोलायमान राहील असे श्रीगणेश सांगतात. मन द्विधा बनेल. जादा हळवेपणा मनाला बेचैन करेल. आईविषयी अधिक भावनाशील राहाल. बौद्धिक चर्चेचे प्रसंग येतील पण वादविवाद टाळा. आणखी वाचा  

कर्क - भावांकडून आज लाभ होईल असे श्रीगणेशांचे सांगणे आहे. मित्रांची भेट आणि स्वकीयांचा सहवास याचा आनंद लाभेल. रम्य स्थळी प्रवासाला जाण्याची शक्यता. प्रत्येक कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आणखी वाचा  

सिंह - विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल. तरीही कुटुंबीयांसमवेत चांगले वातावरण राहील्याने आपली प्रसन्नता वाढेल.  दूरस्थ व्यक्ती किंवा संस्था यांच्याबरोबरचे संबंध दृढ होतील की ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. आणखी वाचा  

कन्या - आजचा दिवस फारच आनंदात जाईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही आणि प्रसन्न राहाल. लक्ष्मीची कृपादृष्टी राहील. मित्र आणि स्नेह्यांची भेट आनददायक राहील. आणखी वाचा  

तूळ - क्रोधावर नियंत्रण ठेवा. शक्यतो वाद टाळावेत. घरातील व्यक्तींशी एखाद्या विषयावर वादविवाद होतील. तब्बेत बिघडेल. विशेषतः डोळ्यांची निगा राखा. अपघाताची शक्यता. आणखी वाचा  

वृश्चिक - आजचा दिवस आपणाला लाभदायक आणि शुभफल प्राप्तीचा ठरेल. सांसारिक सुख मिळेल. विवाहोत्सुकांना विवाहयोग आहेत. व्यवसायात विशेष लाभ होतील. वरिष्ठ अधिकारी आपल्यावर संतुष्ट राहतील.  आणखी वाचा  

धनु - योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. प्रत्येक कामात यश मिळेल. व्यापार विषयक योजना आखाल. दिवस आनंदात जाईल. व्यापारा निमित्ताने प्रवास घडतील. आणखी वाचा  

मकर - श्रीगणेश आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी दर्शवितात. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन अथवा साहित्यविषयक कार्य व्यवस्थित पार पडेल. त्यासाठी नियोजन कराल.  आणखी वाचा  

कुंभ - विचार आपणाला त्रास देतील. त्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. राग जास्त वाढणार नाही याचा संयम बाळगा. कोणत्याही प्रकारच्या अनैतिक कामांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा  

मीन - आजच्या या दिवशी आपण मनोरंजन आणि आनंदात दंग राहाल. कलाकार, लेखक इत्यांदीना आपली प्रतिभा प्रकट करण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारीसाठी चांगली वेळ आहे.  आणखी वाचा 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Todays Horoscope 01 March 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.