शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

आजचे राशीभविष्य: २९ जुलै २०२१ - ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 07:57 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - मनावर थोडा ताण राहील. मुलांना यश मिळेल. कामानिमित्त प्रवास होईल. सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल. आरोग्याची काळजी घ्या. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. आर्थिक आवक ठिकठाक राहील. महत्त्वाची कामे विलंबाने होतील. 

वृषभ - धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. व्यवसाय विक्री चांगली होईल. धाडसी निर्णय घ्याल. आपले अंदाज बरोबर ठरतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. मनासारख्या घटना घडतील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. महत्त्वाचे निरोप येतील.

मिथुन - नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. कामात बदल होतील. कामाचा ताण वाढेल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. गृहसौख्य चांगले राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. चांगल्या घटना घडतील. व्यवसायात बस्तान चांगले बसेल. कागदपत्रे वाचून सही करा.

कर्क - कामे पूर्ण होतील. जी कामे घ्याल, ती तडीस न्याल. नशिबाची साथ मिळेल. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. वाहन सांभाळून चालवा. आरोग्याची काळजी घ्या. जीवनसाथी आपली काळजी घेईल. प्रवासकार्य साधक ठरतील. मनात सकारात्मक विचार राहतील. 

सिंह - फटकळपणे बोलून लोकांना दुखावू नका. महत्त्वाची कामे करण्याच अडचणी येतील. संयमाने वागणे-बोलणे आवश्यक आहे. आर्थिक आवक सामान्य राहील. सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. पथ्यपाणी सांभाळा.

कन्या - नोकरीत जास्त जबाबदारी घ्यावी लागेल. त्यामुळे थकवा येईल. थोडा आराम करा. काहींना पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू बळकच राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. नवीन ओळखी होतील. त्यामुळे फायदा होईल. 

तूळ - महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात अडचणी येतील. थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत धावपळ करावी लागेल. मित्र मदत करण्यासाठी पुढे येतील. मुलांच्या यशामुळे उत्साह द्विगुणित होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. कार्यक्रमात सहभागी व्हाल. 

वृश्चिक - मनात सकारात्मक विचार राहतील. घरात वाद होतील. महत्त्वाचे व्यवहार करताना जाणकारांचा सल्ला घ्या. मुलांना यश मिळेल. त्यामुळे दडपण कमी होईल. नेहमीची कामे वेळेवर करा. धार्मिक कार्यात भाग घ्याल. जुने मित्र, सहकारी यांच्या भेटी होतील. 

धनु - आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीत थोडे अस्थिर वातावरण राहील. काहींची बदली होण्याची शक्यता आहे. तुमचा अभिप्राय घेतला जाईल. आपण तटस्थपणे सल्ला दिला पाहिजे. प्रवास साधक ठरेल. व्यवसायात विक्री चांगली राहील. शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्या. 

मकर - नोकरीत प्रगती होईल. काहींना अधिकार मिळतील. धनप्राप्तीचे होईल. व्यवसायात विक्री चांगली होईल. जनसंपर्क चांगला राहील. व्यवसायात व्यवहार जपून करा. मुलांना काय हवे, नको ते विचारा. मित्रांबरोबर बसून चहापान करण्यासाठी वेळ काढाल. 

कुंभ - अनुकूल घटना घडतील. त्यामुळे उत्साह वाढेल. धनप्राप्ती चांगली होईल. गृहसौख्य लाभेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मुले, जीवनसाथी यांच्यावर चिडचिड करू नका. नातेवाइकांची ख्यालीखुशाली कळेल.

मीन - महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. मुलांच्या यशाची वार्ता समजेल. निर्णय घेताना जीवनसाथीचा सल्ला घ्या. मनात सकारात्मक विचार राहतील. आरोग्याची काळजी घ्या. चौरस आहार घ्या.

- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद) 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य