शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - ०२ जानेवारी २०२२: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना आर्थिक आवक चांगली; यशकारक दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 08:54 IST

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष: भाग्याची उत्तम साथ लाभेल. चांगले प्रवास घडतील. नोकरीत थोडे जास्त परिश्रम करावे लागतील. आर्थिक आवक चांगली राहील. बदलीचीदेखील शक्यता आहे. 

वृषभ: महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे सांभाळा. भामट्यांपासून सावध राहा. नोकरीत गुप्त शत्रू डोके वर काढतील. विविध प्रकारच्या भेटवस्तू मिळतील. जीवनसाथीशी वाद टाळणे योग्य ठरेल. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन: सार्वजनिक कार्यात मान-सन्मान मिळेल. आर्थिक लाभ होतील. फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्या. गुप्त शत्रू कारवाया चालू ठेवतील. मात्र, आपण केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत ठेवणे उपयुक्त ठरेल. 

कर्क: काहींना अचानक धनलाभ होईल. महत्त्वाच्या कामात व्यत्यय येऊ शकेल. मुलांशी वादविवाद टाळा. प्रवासात सतर्क राहणे आवश्यक आहे. संयम सोडू नका. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह: ओळखीतून फायदा होईल. प्रवासात काळजी घ्या. मुलांची काळजी घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाही याकडे पाहा. आर्थिक आवक चांगली राहील.

कन्या: सुखसोयींत वाढ होईल. नोकरीत प्रगतीकारक काळ. उच्च अधिकार मिळतील. जोडीदाराची साथ चांगली राहील. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल.

तूळ: चांगल्या बातम्या कानावर पडतील. अनेक क्षेत्रात आपल्याला यश मिळेल. मनात सकारात्मक आणि आनंदी विचार राहतील. मन प्रसन्न राहील. अनोळखी लोकांशी जास्त सलगी करू नका.

वृश्चिक: व्यवसायात चांगली विक्री राहील. महत्त्वाचे निरोप समजतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. मुलांना उत्तम यश मिळेल. जीवनसाथीशी वाद वाढवू नका. रागावर नियंत्रण ठेवा.

धनु: व्यवसायामध्ये भरभराट होईल. आर्थिक आवक चांगली राहील. मन प्रसन्न राहील. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळू शकेल. काहींना भेटवस्तू मिळतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. विविध कामांमध्ये यश मिळेल. 

मकर: कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. कागदपत्रे नीट वाचून मगच सही करावी. कुणाला जामीन राहू नका. वादविवादापासून दूर राहा. व्यवहारात दक्षता घ्या. संयमाने वागा.

कुंभ: जमिनीच्या व्यवहारात यश मिळू शकेल. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. माहिती घेऊन मगच निर्णय घ्या. सरकारी कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगतीचे योग जुळून येऊ शकतील. नवीन नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. 

मीन: आर्थिक लाभ चांगले होतील. भेटवस्तू मिळतील. धार्मिक कार्यानिमित्त दूरचे प्रवास घडू शकतील. योग्य सल्ला आणि मार्गदर्शन घेऊनच अंतिम निर्णय घ्या. घरी पाहुण्याची वर्दळ राहील. सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य