शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२२: ‘या’ ७ राशींना नोकरीत अनुकूल दिवस; आर्थिक आवक चांगली, अलभ्य लाभाचे योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 07:32 IST

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष: नोकरीत परिस्थिती सामान्य राहील. कामात व्यस्त राहाल. मनात संभ्रम निर्माण होईल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. घरी पाहुणे येतील. मित्रांच्या भेटीगाठी होतील. काहींना अलभ्य लाभ होईल. भेटवस्तू मिळतील. 

वृषभ: अडथळ्यांची शर्यत पार पाडाल. नशिबाची साथ मिळेल. प्रवास होतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. तुमचे महत्त्व वाढेल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. सहकारी मदत करतील. आर्थिक आवक चांगली राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल.

मिथुन: महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. विघ्नसंतोषी लोकांमुळे मनस्ताप सहन करावा लागेल. प्रवास शक्यतो टाळा. वाहने जपून चालवा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. जीवनसाथीशी मधुर संबंध  राहतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल.

कर्क: महत्त्वाचे काम करावयाचे असेल तर चांगला काळ आहे. भाग्याचे पाठबळ मिळेल. सर्वांचे सहकार्य मिळेल. कामे आटोक्यात येतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. जोडीदार चांगली साथ देईल. नोकरीत तुमच्या मताला किंमत दिली जाईल.

सिंह: संमिश्र ग्रहमान राहील. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल. तुमचे महत्त्व वाढेल. वेळेचे नियोजन नीट करा. आरोग्याची काळजी घ्या. आराम करणे आवश्यक आहे. फार दगदग करू नका.

कन्या: सामान्य परिस्थिती राहील. काही कामे मार्गी लागतील. काही कामात गरजेपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. काही कारणाने प्रवास करावा लागेल. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. 

तूळ: धावपळीचा दिवस राहील. घरी पाहुणे येतील. लोकांच्या संपर्कात राहाल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्याल. नोकरीत कामाचा व्याप सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. जोडीदार चांगली साथ देईल. 

वृश्चिक: धार्मिक कार्यात मन रमेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवास होईल. व्यवसायासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नोकरीत संमिश्र परिस्थिती राहील. आरोग्याची काळजी घ्या.

धनु: आर्थिक आवक चांगली राहील व्यवसायात विक्री चांगली राहील. मालमत्तेची कामे करताना खबरदारी घ्या. नातेवाइकांशी संवाद राहील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. एखाद्या सहकाऱ्याशी गैरसमज होऊ शकतात. आपले महत्त्व वाढेल.

मकर: नोकरीत प्रगतीला वाव राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. आर्थिक आवक चांगली राहील. सहजासहजी चांगल्या संधी मिळतील. जोडीदाराच्या मर्जीचा मान राखा. घरात लोकांची ये-जा राहील. मनासारखे भोजन मिळेल. भावंडांशी गैरसमज राहतील.

कुंभ: साधक बाधक परिणाम दिसून येतील. प्रवासात काळजी घ्या. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक आवक चांगली राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात विक्री चांगली राहील. 

मीन: ग्रहमानाची अनुकूलकता आपल्या बाजूने राहील. दगदग होईल. पण कामात यश मिळाल्याने कष्टाचे काही वाटणार नाही. विविध प्रकारचे लाभ होतील. महागड्या वस्तू खरेदी कराल. मुलांना अपेक्षित यश मिळेल. जोडीदार चांगली साथ देईल. 

- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद) 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य