Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ८ मे २०२१; मीनला लक्ष्मीची कृपा, सिंहचा आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 07:30 AM2021-05-08T07:30:49+5:302021-05-08T07:31:13+5:30

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Rashi Bhavishya: Today's horoscope for May 8, 2021 | Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ८ मे २०२१; मीनला लक्ष्मीची कृपा, सिंहचा आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ८ मे २०२१; मीनला लक्ष्मीची कृपा, सिंहचा आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल

Next

मेष - शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इ. चा त्रास होईल. धर्मार्थ काम करताना दाम खर्च करावा लागेल.  आणखी वाचा.

वृषभ - श्रीगणेश सांगतात की आज आपली आवक आणि व्यापार यांत वाढ होईल. व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढतील.  आणखी वाचा.

मिथुन - आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, ऑफिस आणि सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने प्रसन्न वाटेल.  आणखी वाचा.

कर्क - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुवार्ता येतील. आणखी वाचा.

सिंह - आपल्या तब्बेतीकडे विशेष लक्ष पुरविण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल.  आणखी वाचा.

कन्या - सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत लाभाबरोबरच प्रसिद्धी पण मिळेल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. दांपत्यजीवनात परमोच्च सुखाचे क्षण अनुभवाल.  आणखी वाचा.

तूळ - श्रीगणेशांच्या मते नोकरदारांसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत यश आणि सफलता मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. आणखी वाचा.

वृश्चिक - आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य चांगले राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल.  आणखी वाचा.

धनु - आज आपणात शारीरिक आणि मानसिक स्फूर्ती आणि उत्साह यांचा अभाव राहील असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात क्लेश आणि कलहजन्य वातावरण राहील. आणखी वाचा.

मकर - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा पूर्ण दिवस सुखाचा जाईल. अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने आपण प्रत्येक काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल.  आणखी वाचा.

कुंभ - श्रीगणेश सांगतात की द्विधा मनःस्थिती मुळे निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. परिणामतः उलघाल होईल. तब्बेत पण साथ देणार नाही. आणखी वाचा.

मीन- आज आपणाला आनंद, उत्साह आणि प्रसन्नतेचा अनुभव येईल. नवीन कार्यारंभ लाभदायक ठरेल. मित्र आणि घरचे लोक यांच्यासमवेत भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. आणखी वाचा.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rashi Bhavishya: Today's horoscope for May 8, 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app