Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 17 मार्च, 2022; महत्त्वाचा निरोप येईल, मनस्ताप टाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 07:35 IST2022-03-17T07:35:19+5:302022-03-17T07:35:38+5:30

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...  

Rashi Bhavishya: Today's horoscope March 17, 2022; An important message will come, avoid heartache | Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 17 मार्च, 2022; महत्त्वाचा निरोप येईल, मनस्ताप टाळा

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 17 मार्च, 2022; महत्त्वाचा निरोप येईल, मनस्ताप टाळा

मेष- नोकरीत तुमच्या हिताचे निर्णय घेतले जातील. तुमचे वर्चस्व राहील. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगली परिस्थिती राहील. जवळपासचे प्रवास होतील. जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल.

वृषभ- आर्थिक व्यवहार सांभाळून करा. जोडीदाराचे म्हणणे ऐका. त्यातच तुमचे हित राहील. नातेवाइकांच्या भेटी होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. वादाचा प्रसंग खुबीने टाळा. महत्त्वाचा निरोप येईल. इतरांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्याल.

मिथुन- नातेवाइकांच्या संपर्कात राहाल. काहींना प्रवास करावा लागेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आनंद घ्याल. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या शब्दाला मान राहील. नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील.

कर्क- कामात उत्साह राहील. आत्मविश्वासाने कामे कराल. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. जोडीदार तुमच्या विचाराने वागेल. जमिनीचे व्यवहार सुकर होतील. धनप्राप्तीचे योग आहेत. लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्याल. मात्र बोलताना संयम सोडू नका.

सिंह- महत्त्वाचे निरोप येतील. नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार येईल. मनात आनंदी विचार राहतील. आरोग्यात सुधारणा होईल. ग्रहमानाची अनुकूलता राहील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. जोडीदार चांगली साथ देईल.

कन्या- संमिश्र ग्रहमान राहील. काही कटू आणि गोड अनुभव येतील. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. जोडीदाराच्या मर्जीनुसार वागणे इष्ट ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. महत्त्वाचा निरोप येईल. मनावरचा संयम सोडू नका.

तूळ- आर्थिक आवक मनासारखी राहील. जुनी येणी वसूल होतील. काही अनपेक्षित लाभ होतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. एखाद्या विषयाचे ज्ञान घेण्यासाठी वेळ द्याल. नवीन माहिती कळेल.

वृश्चिक- नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. तुमच्या अनुकूल घटना घडतील. घरी पाहुणे येतील. कामाचा व्याप वाढेल. व्यवसायात भरभराट होईल. गुंतवणुकीचा फायदा होईल. तुमचा सल्ला योग्य ठरेल.

धनू- नशिबाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. विविध कामे मार्गी लागतील. विविध प्रकारचे लाभ होतील. मालमत्तेची कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक चांगली राहील. काहींना प्रवास करावा लागेल. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील.

मकर- संमिश्र ग्रहमान राहील. आर्थिक आवक चांगली राहील, महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. थोडा संयम ठेवलेला बरा. व्यवसायात विक्री चांगली राहील. सतत कार्यरत राहावे लागेल. बोलण्यात गोडवा असू द्या. कायद्याची बंधने पाळा.

कुंभ- अनुकूल परिस्थिती राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. खर्च करण्याकडे कल राहील. एखाद्या व्यवहारात यशस्वी मध्यस्थी कराल. त्यामुळे तुमचे महत्त्व वाढेल. एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात व्यस्त राहाल.

मीन- महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. अन्यथा वेळ व पैसा जास्त खर्च होईल. लोकांशी संबंध सुधारतील. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. निष्कारण मनस्ताप टाळा. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. पथ्यपाणी सांभाळा.

-विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)

Web Title: Rashi Bhavishya: Today's horoscope March 17, 2022; An important message will come, avoid heartache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.