Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 19 जानेवारी, 2022; मालमत्तेच्या व्यवहारात फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 07:48 AM2022-01-19T07:48:46+5:302022-01-19T07:49:09+5:30

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Rashi Bhavishya: Today's horoscope January 19, 2022 | Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 19 जानेवारी, 2022; मालमत्तेच्या व्यवहारात फायदा 

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 19 जानेवारी, 2022; मालमत्तेच्या व्यवहारात फायदा 

Next

मेष- नोकरीत प्रगतीला वाव मिळेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. घरात खाण्या-पिण्याची चंगळ राहील. नातेवाइकांच्या भेटी होतील. गप्पाटप्पा होतील. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. सकारात्मक वातावरण राहील, धनलाभ होईल. जुनी येणी वसूल होतील.

वृषभ- व्यवसायात भरभराट होईल. मालाला उठाव राहील. एखाद्या मोठ्या सौद्यात फायदा होईल. मात्र, आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घ्या. कागदपत्रे वाचून पहा. काहींना प्रवास करावा लागेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. एखाद्या मुद्यावर मतभेद होतील.

मिथुन- मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. मनाप्रमाणे व्यवहार जुळून येतील. आर्थिक आवक चांगली राहील, कागदपत्रे वाचून सही करा. मुलांच्या अडचणी समजून घ्या. सहकारी मदत करतील. मात्र, कुणावर किती विश्वास ठेवायचा ते काळजीपूर्वक ठरवा.

कर्क- विविध प्रकारच्या कामांना गती मिळेल. महत्त्वाचे काम प्राधान्याने कराल. जोडीदार तुमच्या पाठीशी राहील. मनातील मरगळ झटकून टाकून उत्साहाने कामे करा. एखाद्याचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. मन प्रसन्न राहील.

सिंह- काही कामे मनासारखी होणार नाहीत, तर काही पूर्ण होतील. सकारात्मक विचार ठेवा. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. कामाचा ताण राहील. नियोजनबद्ध पद्धतीने काम करा. कामाबरोबर आरामाकडेही लक्ष द्या.

कन्या- ग्रहमानाची अनुकूलता राहील. व्यवसायात भरभराट होईल. सार्वजनिक कार्यात भाग घ्याल. प्रशंसा होईल. आर्थिक आवक चांगली राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल. मात्र, सर्वच अपेक्षा पूर्ण होतील असे नाही. त्यामुळे थोडा संयम ठेवलेला बरा.

तूळ- नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. उच्च पदस्थांना बदलीला सामोरे जावे लागेल. प्रगतीला पूरक वातावरण राहील. घरी पाहुणे येतील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. तब्येतीची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. अनेक आघाड्यांवर कसरत करावी लागेल.

वृश्चिक- दूरचा प्रवास करावा लागेल. प्रवास कार्य साधक ठरेल. शेती, प्लॉट खरेदीसाठी चांगला काळ आहे. व्यवहारात लाभ होईल. नशिबाची साथ राहील. घरी पाहुणे येतील. एखाद्या कार्यक्रमात लोकांच्या भेटीगाठी होतील. मुलांना योग्य मार्गदर्शन करा.

धनू- धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. वडिलोपार्जित संपत्तीची कामे मार्गी लागतील. प्रवासात दगदग होईल. फार कष्ट घेऊ नका. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. जोडीदाराची चांगली साथ राहील. महत्त्वाचे काम पुढे ढकलता आले तर बघा. घरात घुसफूस होईल.

मकर- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल. शर्यती, पंजा लावण्याचा मोह टाळा. खाण्या पिण्याची काळजी घ्या. कायद्याची बंधने पाळा. अति उत्साह अंगलट येऊ शकतो. त्यामुळे थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे.

कुंभ- महत्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. नोकरीत प्रगतीला पोषक वातावरण राहील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. अधिकारी वर्गाच सहकार्य मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. पथ्यपाणी सांभाळा. प्रवासात दगदग होण्याची शक्यता आहे.

मीन- अनुकूल घटना घडतील. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. भेटवस्तू मिळतील. हातून सत्कृत्य घडेल. इतरांना मदत करण्याकडे कल राहील.
-विजय देशपांडे ज्योतिष विशारद)

Web Title: Rashi Bhavishya: Today's horoscope January 19, 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app