Rashi Bhavishya Todays horoscope for 18 April 2021 | आजचं राशीभविष्य १८ एप्रिल २०२१- उत्साह जाणवणार नाही; कुटुंबात वादविवाद होतील

आजचं राशीभविष्य १८ एप्रिल २०२१- उत्साह जाणवणार नाही; कुटुंबात वादविवाद होतील

मेष - श्रीगणेशांच्या दृष्टीने आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी आहे. नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळेल व नवीन कार्याचा आरंभ कराल. मनात शीघ्र बदल होतील व मन द्विधा बनेल. आज नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. आणखी वाचा

वृषभ - हाती आलेली संधी अनिर्णायकतेमुळे आपण आज गमावून बसाल आणि संधीचा लाभ घेता येणार नाही असे श्रीगणेश सुचवितात. विचारांत व्यस्त राहाल. त्यामुळे कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश यांना वाटते की आज आपल्या दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन आणि स्वस्थचित्ताने होईल. मित्र आणि नातलगांसोबत सहभोजनाचा आनंद लुटाल. सुंदर वस्त्रे परिधान कराल. आर्थिक दृष्टीने लाभदायक दिवस. आणखी वाचा

कर्क - मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कोणताही अंतिम निर्णय घेऊ शकणार नाही. असमंजसपणामुळे मनाला यातना होतील. संबंधितांचे गैरसमज होतील. कौटुंबिक बाबींवर खर्च होईल. भांडण, मारामारी यांपासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. आणखी वाचा

सिंह - आजचा दिवस फार चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी गमावाल असा इशारा श्रीगणेश देतात. मन विचारात गढून जाईल. नवे कार्य हाती घेऊ नका. आणखी वाचा

कन्या - गणेशजी म्हणतात की आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. नवीन कार्ये आज सफल होतील. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी फायद्याचा दिवस. त्यांना पदोन्नती मिळू शकते. वरिष्ठ अधिकार्‍याकडून फायदा होईल. आणखी वाचा

तूळ - आज आपण बौद्धिक व लेखन कार्यात व्यग्र असाल, असे गणेशजी म्हणतात. नवीन कार्यारंभास शुभ दिवस दूरचा प्रवास, धार्मिक स्थळांना भेटीचा आज योग आहे. व्यवसाय धंद्यात फायदा. परदेशातील मित्रांचे समाचार मिळतील. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस सावधतेने घालविण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. नवीन कार्याची सुरुवात करु नका. तसेच रागावर नियंत्रण ठेवा. अनैतिक कामकृत्या पासून दूर राहा. राजकीय गुन्ह्यापासून दूर राहा. आणखी वाचा

धनु - आजचा आपला दिवस आनंदात व समाधानात जाईल असे श्रीगणेश सांगतात. मनोरंजन, पार्टी, पिकनिक, प्रवास, सुग्रास भोजन व सुंदर वस्त्र प्रावरणेही आजच्या दिवसाची विशेषता असेल. रोमांचक गाठीभेटी होतील. आणखी वाचा  

मकर - व्यापार धंद्यात वाढ होईल असे श्रीगणेश सांगतात. त्यादृष्टीने पुढे वाटचाल करा. पैशाचे व्यवहार सहज होतील. घरातील वातावरण आनंदी असेल. आवश्यक ठिकाणीच पैसा खर्च होईल. नोकरीत सहकार्यांकडून सहकार्य मिळेल. आणखी वाचा

कुंभ -आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करण्याची सूचना श्रीगणेश देतात. आज विचारात बदल दिसून येईल. महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा. प्रवास शक्यतो टाळावेत. संतती विषयी काळजी राहील. आणखी वाचा

मीन - नावडत्या घटनांमुळे आजचा दिवस उत्साहात जाणार नाही असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात वादविवाद होतील. आईचे स्वास्थ्य बिघडून चिंता निर्माण होईल. मन नाराज राहील. स्वास्थ्य बिघडल्याने झोप लागणार नाही. आणखी वाचा

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rashi Bhavishya Todays horoscope for 18 April 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.