आजचं राशीभविष्य १३ एप्रिल २०२१- आजचा दिवस प्रणय, रोमॅन्स, मनोरंजन अन् मजा-मस्तीचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 07:11 AM2021-04-13T07:11:07+5:302021-04-13T07:13:22+5:30

Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Rashi Bhavishya Todays horoscope for 13 April 2021 | आजचं राशीभविष्य १३ एप्रिल २०२१- आजचा दिवस प्रणय, रोमॅन्स, मनोरंजन अन् मजा-मस्तीचा

आजचं राशीभविष्य १३ एप्रिल २०२१- आजचा दिवस प्रणय, रोमॅन्स, मनोरंजन अन् मजा-मस्तीचा

Next

मेष - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक काम उत्साह आणि आवेश यांनी पूर्णतः भरलेले असेल असा अनुभव येईल. शरीर व मन स्फूर्ती आणि टवटवीतपणाने भरेल. परिवारातील वातावरण चांगले राहील. आणखी वाचा

वृषभ - क्रोध आणि निराशेची भावना मनात पसरेल. तब्बेत साथ देणार नाही. घर-परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल. आणखी वाचा

मिथुन - कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहील. नोकरी- व्यवसायात लाभाच्या वार्ता मिळतील. उच्च पदाधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील. विवाहयोग आहेत. स्त्री स्नेह्यांकडून विशेष लाभ होतील. आणखी वाचा

कर्क - गृहसजावटीवर विशेष लक्ष द्याल. घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल. व्यापारी आणि नोकरदार लाभाची आणि बढतीची अपेक्षा करू शकतात. कुटुंबात सुख- शांती लाभेल. आणखी वाचा

सिंह - श्रीगणेश सांगतात की स्वभावात उग्रता आणि संताप असल्यामुळे काम करण्यात आपले मन लागणार नाही. वादविवादात आपल्या अहंकारमुळे कोणाची नाराजी ओढवून घ्याल. आणखी वाचा

कन्या - श्रीगणेशांच्या दृष्टीने आज तुम्ही एखादे काम हाती घेणे हिताचे ठरणार नाही. बाहेरचे खाण्यामुळे तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरेल. आणखी वाचा

तूळ - प्रणय, रोमॅन्स, मनोरंजन आणि मौज- मस्तीचा दिवस आहे. सार्वजनिक जीवनात महत्त्व मिळेल. यश आणि कीर्ती वाढेल. भागीदारांबरोबर लाभाच्या गोष्टी होतील. भारी वस्त्रे आणि अलंकार यांची खरेदी होईल. आणखी वाचा

वृश्चिक - आज आपण निश्चिंतपणा आणि सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल. कामाच्या ठिकाणी सहकारी वर्गाची खूप मदत झाल्याने अनेक कामे हाता वेगळी कराल. आणखी वाचा

धनु - यात्रा- प्रवासाचा बेत स्थगित ठेवा असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. कार्यातील अपयश मनात निराशा निर्माण करील आणि त्यामुळे संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्याने गोष्टी जास्त चिघळणार नाहीत. आणखी वाचा  

मकर - प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल असा इशारा श्रीगणेश देतात. घरगुती क्लेश मनाला यातना देतील. आईची तब्बेत मनात चिंता उत्पन्न करेल. सार्वजनिक जीवनात अपयश, अपकीर्ती होईल किंवा मान- प्रतिष्ठेची हानी होईल. आणखी वाचा

कुंभ - श्रीगणेश सांगतात की आज आपले मन मोकळेपणा अनुभवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. शेजारी आणि भावंडांशी अधिक मेळ जमेल. आणखी वाचा

मीन - जादा खर्च, संताप आणि जीभ यावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार आणि पैशाची देव-घेव याविषयी सावध राहा. आणखी वाचा

 

Web Title: Rashi Bhavishya Todays horoscope for 13 April 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.