शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

Horoscope :साप्ताहिक राशीभविष्य, १३ ते १९ फेब्रुवारी २०२२, कुणावरही पटकन विश्वास ठेवू नका; कसा असेल हा आठवडा, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 09:38 IST

Weekly Horoscope, 13th to 19th February 2022: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आठवडा, काय सांगते तुमची रास

मेष - अतिशय अनुकूल असे वातावरण राहील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. चांगल्या बातम्या पडतील. सरकारी कामे मार्गी लागतील. बरेच दिवस रेंगाळत पडलेली कामे कामे झाल्यामुले सुखद धक्का बसेल. जे विद्यार्थी परीक्षेच्या निकालाची वाट पाहत असतील. त्यांना आनंदाची बातमी कळेल. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळचा प्रवास होईल. घरी पाहुणे येतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. - सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवात चांगले दिवस.  

वृषभ - या आठवड्यात थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. एखाद्या सौद्यात फटका बसू शकतो. फाजील आत्मविश्वास दाखवू नका. कुणावरही पटकन विश्वास ठेवू नका. लोक गोड बोलून तुम्हाला गंडवण्याचा प्रयत्न करतील. आपले कोण आणि परके कोण यातील फरक ओळखा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे इष्ट ठरेल. मित्राच्या नादात वहावत जाऊ नका. अन्यथा अडचणीत याल. घरच्या लोकांची चिंता वाढेल. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला ऐकण्यात हित राहील. - रविवार, सोमवार, मंगळवार, गुरुवार हे चांगले दिवस.   मिथुन - प्रसन्न ग्रहमान राहणार आहे. मित्र मैत्रिणींच्या सहवासात मौजमजा करण्यात वेळ जाईल. विवाहोत्सुकांचा विवाह ठरवण्याच्या दृष्टीने हालचाल होईल. पाहुण्यारावळ्यांचा राबता राहील. भावंडांच्या भेटी होतील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. धनलाभ होईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. एखादी नवी माहिती कळेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. नवीन प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.  रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस. 

कर्क - ग्रहमानाची साथ तुम्हाला मिळेल. आठवडा लाभदायक ठरेल. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. अडलेली कामे मार्गी लागतील. काही नवीन लोकांच्या संपर्कात याल. जमिनीच्या सौद्यात किंवा एखाद्या प्रकल्पात तुमचा अभिप्राय महत्त्वाचा ठरेल. तुमच्या शब्दाला मान राहील. आर्थिक फायदे होतील. जर कर्ज मिळावे म्हणून प्रयत्न करत असाल तर ते काम होईल. भेटवस्तू मिळतील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. व्यवसायात भरभराट होईल. नातलग भेटतील. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

सिंह - आवडत्या व्यक्तीच्या सहवासात याल. नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. काहींना चांगल्या बातम्या कळतील. समाजसेवा करण्यासाठी पुढाकार घ्याल. मानसन्मान मिळेल. प्रतिष्ठेत वाढ होईल. प्रसिद्धी नावलौकिकात भर पडेल. आर्थिक आवक उत्तम राहील. भेटवस्तू मिळतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. दूरचे प्रवास करावे लागतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. परिश्रमाचे चीज झाल्यासारखे वाटेल. - रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस  

कन्या - मनावरील ताण निघून जाईल. हलकेहलके वाटेल. मनात आनंद लहरींचे तरंग उठतील. घरात काही कारणाने धार्मिक कार्य केले जाईल. त्या निमित्ताने लोकांची ये जा राहील. पर्यटनाच्या निमित्ताने फिरण्याचा योग येईल. कामे मार्गी लागतील विविध प्रकारचे लाभ होतील. नोकरीत अनुकूल बदल होतील. नवीन ठिकाणी जावे लागेल. आर्थिक आवक दमदार राहील. त्यामुळे गुंतवणूक करण्याचा निर्णय गेण्यात येईल. जाणकारांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. - रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस. 

तूळ - भाग्याची साथ राहील. घरात मंगलकार्य ठरण्याच्या दृष्टीने हालचाली वेग घेतील. उपवर मुली आणि मुले यांच्यासाठी अनुकूल काळ. विद्यार्थ्यांना उल्लेखनीय कामगिरी करता येईल. त्यामुळे पालकांना धन्यता वाटेल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित यश मिळेल. उंची वस्त्रे दागिने यांची खरेदी कराल. काहींना आवडत्या व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. घरी पाहुणे येतील. त्यांचा पाहुणचार करण्यात वेळ जाईल. माहेरची मंडळी भेटल्याने महिलांना आनंद होईल. - सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस 

वृश्चिक - अतिशय सुरेख ग्रहमान आहे. आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतील. त्यासाठी थोडे सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. अचानक धनलाभ होईल. प्रवासकार्य साधक ठरेल. नोकरीत अनुकूल बदल होतील.घरी पाहुणे येतील.भेटवस्तू मिळतील. आर्थिक आवक राहील. मनासारखे पदार्थ ताटात दिसतील. समाजसेवा करण्यात व्यस्त राहाल. मानसन्मान मिळेल. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. कौतुकाची थाप पाठीवर पडेल. - सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस

धनू - विविध प्रकारचे फायदे या सप्ताहात आपल्याला होतील. अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात यश मिळेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. तुमच्या अनुरूप असे घटनाक्रम घडतील. व्यवसायात बरकत राहील. मोठ्या उलाढाली होतील. नवीन योजना आखून त्या यशस्वीपणे पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल. अंदाज बरोबर ठरतील. त्याचा इतरांनाही फायदा होईल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. नात्यात गोडवा राहील. भेटवस्तू देण्यासाठी चांगला काळ आहे. - रविवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस  मकर - विविध प्रकारचे लाभ होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसे खर्च कराल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. मात्र थोडी दगदग होऊ शकते. तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. जीवनसाथी चांगली साथ देईल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मात्र कागदपत्रे पाहूनच मगच सही करा. थोडे जागरुक राहून माहिती काढण्याचा प्रयत्न करा. काहींना अचानक धनलाभ होई शकतो. सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस

कुंभ - अनुकूल घटना अनुभवण्यास मिळतील. सुखद समाचार कानावर पडतील. त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील. नवीन प्रकल्प राबवले जातील. नवीन कार्यक्षेत्राशी परिचय होईल. मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. विवाह करण्याच्या दृष्टीने हालचाली टप्प्यात येतील. विद्यार्थ्यांना आई वडिलांकडून शाबासकी मिळेल. परीक्षेत यश मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. महागड्या गाड्या खरेदी कराल. - रविवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

मीन -  मनाला आनंद मिळेल अशा घटना या आठवड्यामध्ये घडतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. मालाला योग्य भाव मिळेल. नावलौकीक वाढवणाऱ्या घटना घडतील. घर शेती खरेदीचे मनसुबे रचले जातील. ते पूर्णत्वास जातील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. योग्य मार्गदर्शन मिळेल. घरी पाहुणे येतील. नोकरीत अनुकूल स्थिती राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. रविवार, सोमवार, मंगळवार शनिवार चांगले दिवस. 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष