शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

राशीभविष्य - 9 ऑक्टोबर 2020, 'या' राशीच्या लोकांना सरकारकडून फायदा होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 21:03 IST

जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

मेष - श्रीगणेशांच्या दृष्टीने आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी आहे. नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळेल व नवीन कार्याचा आरंभ कराल. मनात शीघ्र बदल होतील व मन द्विधा बनेल. आज नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. निश्चित हेतूने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. छोटे प्रवास होतील.  आणखी वाचा

वृषभ - हाती आलेली संधी अनिर्णायकतेमुळे आपण आज गमावून बसाल आणि संधीचा लाभ घेता येणार नाही असे श्रीगणेश सुचवितात. विचारांत व्यस्त राहाल. त्यामुळे कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. एखादे नवीन काम सुरू करणे हितावह नाही. वादविवाद अथवा चर्चेत आपल्या हटवादीपणामुळे संघर्षीची शक्यता आहे. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश यांना वाटते की आज आपल्या दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन आणि स्वस्थचित्ताने होईल. मित्र आणि नातलगांसोबत सहभोजनाचा आनंद लुटाल. सुंदर वस्त्रे परिधान कराल. आर्थिक दृष्टीने लाभदायक दिवस. खर्चावर नियंत्रण ठेवा. मनातून नकारात्मक विचार काढून टाकण्याची सूचना श्रीगणेश देतात. आणखी वाचा

कर्क - मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कोणताही अंतिम निर्णय घेऊ शकणार नाही. असमंजसपणामुळे मनाला यातना होतील. संबंधितांचे गैरसमज होतील. कौटुंबिक बाबींवर खर्च होईल. भांडण, मारामारी यांपासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. समस्या त्वरित सोडवाल. अपघातापासून सावध राहा. अविचारी वर्तना पासून दूर राहाणे हिताचे ठरेल. आणखी वाचा

सिंह - आजचा दिवस फार चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी गमावाल असा इशारा श्रीगणेश देतात. मन विचारात गढून जाईल. नवे कार्य हाती घेऊ नका. मैत्रिणींची भेट होईल आणि त्यांच्याकडून लाभही होईल. मित्रांबरोबर सहलीचा बेत आखाल. आणखी वाचा

कन्या - गणेशजी म्हणतात की आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. नवीन कार्ये आज सफल होतील. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी फायद्याचा दिवस. त्यांना पदोन्नती मिळू शकते. वरिष्ठ अधिकार्‍याकडून फायदा होईल. पैसा, मान- सम्मान मिळेल. वडिलाकडून फायदा. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. आरोग्य चांगले राहील. सरकारी कामे होतील. सरकारकडून फायदा होईल. आणखी वाचा

तूळ – आज आपण बौद्धिक आणि लेखनाच्या कामात सक्रिय असाल, असे गणेशजींनी सांगितले आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. दीर्घ मुक्काम अथवा एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा योग येईल. व्यवसायात नफ्याची संधी मिळेल. परदेशात राहणाऱ्या मित्र किंवा प्रियजनांकडून विचारपूस होईल, व्यवसायात किंवा नोकरीत सहका-यांचे सहकार्य कमी होईल. आरोग्य सांभाळावे लागेल. मुलांच्या प्रश्नात अडचण होईल, विरोधकांशी तीव्र चर्चा करू नये अशी सूचना गणेशजींना दिली.

वृश्चिक -आजचा दिवस सावधतेने घालविण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. नवीन कार्याची सुरुवात करु नका. तसेच रागावर नियंत्रण ठेवा. अनैतिक कामकृत्या पासून दूर राहा. राजकीय गुन्ह्यापासून दूर राहा. नवे संबंध जोडताना गांभीर्याने विचार करा. खर्च अधिक होईल.  आणखी वाचा

धनु - आजचा आपला दिवस आनंदात व समाधानात जाईल असे श्रीगणेश सांगतात. मनोरंजन, पार्टी, पिकनिक, प्रवास, सुग्रास भोजन व सुंदर वस्त्र प्रावरणेही आजच्या दिवसाची विशेषता असेल. रोमांचक गाठीभेटी होतील. लेखन कार्याला चांगला दिवस. बौद्धिक विचारांची देवाणघेवाण होईल. भागीदारीत फायदा. प्रसिद्धी मिळेल. आणखी वाचा

मकर - व्यापार धंद्यात वाढ होईल असे श्रीगणेश सांगतात. त्यादृष्टीने पुढे वाटचाल करा. पैशाचे व्यवहार सहज होतील. घरातील वातावरण आनंदी असेल. आवश्यक ठिकाणीच पैसा खर्च होईल. नोकरीत सहकार्यांकडून सहकार्य मिळेल. व्यापार्यांना कायदेशीर त्रास संभवतो. आणखी वाचा

कुंभ - आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करण्याची सूचना श्रीगणेश देतात. आज विचारात बदल दिसून येईल. महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा. प्रवास शक्यतो टाळावेत. संतती विषयी काळजी राहील. लेखन व नवनिर्माण या कामासाठी चांगला दिवस. आणखी वाचा

मीन - नावडत्या घटनांमुळे आजचा दिवस उत्साहात जाणार नाही असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात वादविवाद होतील. आईचे स्वास्थ्य बिघडून चिंता निर्माण होईल. मन नाराज राहील. स्वास्थ्य बिघडल्याने झोप लागणार नाही. स्त्रियांबरोबर व्यवहार करताना काळजी घ्या. पैसा आणि कीर्ती यांची हानी. नोकरदारांना नोकरीत चिंता. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य