शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - ८ ऑक्टोबर 2020, 'या' राशीच्या लोकांना व्यापारात फायदा अन् धनलाभाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 21:10 IST

जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

मेष - आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल असे श्रीगणेश सांगतात. लेखक व कलाकारांसाठी अनुकूल काळ. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता वाढेल. त्यामुळे उत्साह कमी होईल. हळवेपणा वाढेल. मित्रांसमवेत प्रवासाचे बेत आखाल. आणखी वाचा

वृषभ - महत्त्वाची कामे आज पूर्ण करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. धनलाभाची शक्यता. शारीरिक आणि मानसिक दृष्टी या उत्साही राहाल. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात जाईल. दुपारनंतर व्यावहारिक निर्णय घेण्यात द्विधा वाढेल. आलेली संधी गमावून बसाल. हटवादीपणामुळे इतरांशी संघर्ष, होण्याची शक्यता. शक्यतो नवे कार्य दुपारपूर्वी पूर्ण करा. आणखी वाचा

मिथुन - आज सांभाळून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. घरात कुटुंबीयांचा विरोध राहील. हाती घेतलेली कामे अपूर्ण राहतील. शारीरिक अस्वास्थ्य आणि मानसिक व्यग्रता अनुभवाल. दुपारनंतर कामाचा उत्साह वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. आत्मविश्वास वाढेल. आणखी वाचा

कर्क - आज व्यापारात लाभाचे योग श्रीगणेश सांगतात. रम्य स्थळी सहलीचे बेत आखाल. दुपारनंतर मात्र शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडेल. डोळ्यांच्या विकाराचा त्रास सतावेल. कुटुंबातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल.  आणखी वाचा

सिंह - नवीन कार्यारंभास आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कामे पूर्ण होतील. मित्र व स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. व्यापारात नवीन संपर्कामुळे भविष्यात लाभ होण्याची शक्यता. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत दिवस आनंदात जाईल. उत्पन्न वाढेल. आणखी वाचा

कन्या - आपल्या व्यवसायात इतरांनापण धनलाभ होईल असे श्रीगणेश सांगतात. दूरच्या प्रवासाचे योग येतील. तब्बेत सांभाळून राहा. दूरस्थ स्नेह्यांकडून वार्ता प्राप्त होतील. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. दिवसभर मनात सुखा- समाधानाची भावना राहील. व्यवसायात बढतीमुळे लाभ होईल. आणखी वाचा

तूळ – शिथिलता आणि जास्त कामांमुळे तुम्हाला मानसिक त्रास होईल. आपले काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात सक्षम व्हाल. आरोग्यासाठी हानिकारक आहार घेऊ नका. प्रवासात अडथळा येण्याची शक्यता आहे. परंतु दुपारनंतर आपणास दूर असलेल्या आपुलकीच्या नातेवाईकांच्या बातम्या प्राप्त झाल्याने आपण आनंद द्विगुणीत होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्साह असेल. परदेशात जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. व्यवसायालाही फायदा होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत खाण्यापिण्याचा आनंद लुटाल. कामे अपूर्ण राहातील. प्रवासात विघ्न येऊ शकते. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस आनंदपूर्ण आणि उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल असे श्रीगणेश सांगतात. योजने प्रमाणे कामे पूर्ण होतील. अपूर्ण कार्ये तडीस जातील. धनलाभाची शक्यता. गृहस्थीजीवनात गोडी राहील. अचानक धनलाभ होईल. छोटया प्रवासाचे बेत आखाल. व्यापारी वर्गाचा व्यापार वाढेल. आणखी वाचा

मकर - कष्टाच्या मानाने फळ कमी मिळेल असे श्रीगणेश सांगतात. तरीही कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. तब्बेत चांगली राहील. त्या दृष्टीने बाहेरचे खाणे-पिणे टाळा. दुपारनंतर अपुरी कामे पूर्ण होतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील व ते सुधारेल. आणखी वाचा

कुंभ - विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडू यांना आजचा दिवस चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. वडिलांकडून तसेच सरकार कडून लाभ होतील. खंबीर मनोबल असेल. त्यामुळे कार्यपूर्ती होण्यात कसलीच अडचण येणार नाही. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील, सबब शक्यतो बाहेरचे खाणे- पिणे टाळा. आणखी वाचा

मीन - काल्पनिक विश्वात दिवस घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत खाण्या-पिण्याचे बेत कराल. आत्मविश्वास व एकाग्रचित्ताने दैनंदिन काम पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ. संततीसाठी अनुकूल दिवस. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य