Horoscope - October 19, 2020 | राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२०, आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल

राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२०, आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल

मेष -  श्रीगणेश म्हणतात की आज आपणाला आध्यात्मिक दृष्टीने एक वेगळा अनुभव देणारा दिवस आहे. गूढ आणि रहस्यमय विद्या आणि त्यांसंबंधी गोष्टी यांचे आकर्षण राहील. आज आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होण्याचा योग आहे. वाणी व द्वेष भावना यांवर आवर घाला. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज आपल्या कौटुंबिक जीवनात सुखांचा अनुभव घ्याल. घरातील सदस्य आणि निकटवर्गीयांबरोबर प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल. त्याचबरोबर छोटया प्रवासाचे बेत आखाल. परदेशात राहण्यार्‍या संबंधिताकडून वार्ता येतील. आणखी वाचा   

मिथुन -  आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी जाईल असे श्रीगणेशांना सूचित करायचे आहे. घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. अपूर्ण कामे तडीस जातील आणि त्यामुळे आपणांस यश व कीर्ती लाभेल. आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल. आणखी वाचा  

कर्क - आपण शांततेत आजचा दिवस घालवा असा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडेल. पोटदुखीचा विकार बळावेल. मानसिकदृष्टया चिंता आणि उद्वेग राहील. अचानक खर्च वाढतील. वादविवाद टाळा. आणखी वाचा  

सिंह - श्रीगणेश सांगतात की आज आपण शारीरिक दृष्टया अस्वस्थ आणि मानसिक दृष्टया दुःखी राहाल. घरातील व्यक्तींबरोबर मतभेद होतील. गैरसमज वाढतील आणि मन उदास राहील. आईशी मतभेद राहतील आणि तिच्या तब्बेतीची काळजी राहील. आणखी वाचा      

कन्या - कोणत्याही कामात विचारपूर्वक पाऊल टाकण्याची सूचना श्रीगणेश देतात. भाऊ बहिणींशी प्रेमाचे संबंध बनून राहील. मित्र आणि स्वकीयांशी सुसंवाद घडतील. आणखी वाचा   

तूळ – श्रीगणेश सांगतात की आज आपले मनोबल कमी राहील. त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे अवघड होईल. नवीन काम किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नका. घरातील व्यक्तींशी वादविवाद होणार नाहीत. आणखी वाचा    

वृश्चिक - आजचा दिवस आपणासाठी शुभ आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरातील व्यक्तींसमवेत दिवस आनंदात घालवाल. स्वकीयांकडून भेटवस्तू प्राप्त होतील. आणखी वाचा   

धनु -  श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणासाठी समस्यापूर्ण राहील. कुटुंबीयांशी चर्चा होईल व दुःखी व्हाल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. मनाचा अतिउत्साह आवरावा लागेल. आणखी वाचा      

मकर -  मित्र आणि संबंधितांशी भेट झाल्याने दिवस आनंदात जाईल. सामाजिक क्षेत्र, व्यापार व इतर क्षेत्रातही आजचा दिवस आपणाला लाभदायक आहे. विवाहोत्सुकांना जीवनसाथी अगदी सहज निवडता येईल. आणखी वाचा  

कुंभ -   श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. आज प्रत्येक कामात सहज यश मिळेल. मनःस्थिती आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे बढती मिळेल. आणखी वाचा

मीन -  श्रीगणेश सांगतात की मनाचे अस्वास्थ्य तुम्हाला ग्रस्त ठेवेल. शरीरात थकवा व आळस जाणवेल. वरिष्ठांशी व्यवहार जपून करा. संततीची काळजी राहील. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Horoscope - October 19, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.