राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२१: मिथून राशीतील व्यक्तींना आपल्या संतापावर नियंत्रण ठेवण्याची गरज; शारीरिक प्रकृतीही बिघडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 08:30 IST2021-11-21T07:50:38+5:302021-11-21T08:30:56+5:30
Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२१: मिथून राशीतील व्यक्तींना आपल्या संतापावर नियंत्रण ठेवण्याची गरज; शारीरिक प्रकृतीही बिघडेल
मेष- खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत, कारण आज पैसा खर्च होण्याचे योग आहेत. पैसे आणि देवाण- घेवाण या विषयी सावधानी बाळगा. आणखी वाचा
वृषभ - श्रीगणेशाच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली रचनात्मक आणि कलात्मक क्षमता वाढेल. मानसिकदृष्टया वैचारिक स्थिरता येईल. त्यामुळे मन लावून काम कराल. आर्थिक जवाबदारी व्यवस्थित पार पाडाल. आणखी वाचा
मिथुन - श्रीगणेश सावध करताना आपणाला सांगतात की आजचा दिवस कष्टप्रद असल्याने प्रत्येक कामात सावध राहा. कुटुंबीय आणि संततीशी पटणार नाही. आवेश आणि संतापावर नियंत्रण ठेवा म्हणजे कामे बिघडणार नाहीत. शरीर प्रकृती बिघडेल. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस आपणासाठी लाभदायक आहे. उत्पन्न वाढेल. इतर काही मार्गानी पण आर्थिक लाभ होतील. मित्र भेटतील. स्त्रीवर्गाकडून विशेष लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. जीवनसाथी व संततीकडून सुख मिळेल. विवाहयोग आहेत. आणखी वाचा
सिंह - श्रीगणेश सांगतात की व्यवसायाच्या दृष्टिने आजचा दिवस श्रेष्ठ आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. पैतृक लाभाचे संकेत आहेत. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस चांगला जाईल. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता. धार्मिक कार्य व धार्मिक यात्रा यांत मग्न राहाल. परदेशास्थित आप्तेष्टांकडून आनंदाच्या वार्ता मिळतील. आणखी वाचा
तूळ- आज नवे कार्य हाती घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. बोलणे आणि कृती यांवर संयम ठेवणे हितावह ठरेल. द्वेषापासून दूर राहा आणि हितशत्रूपासून जपा. तब्बेतीकडे लक्ष द्या. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस काहीसा वेगळाच जाईल. स्वतःसाठी वेळ काढाल. मित्रांबरोबर प्रवास, मोज-मजा, मनोरंजन आणि छोटया सहली तसेच भोजन, वस्त्रप्रावरण इ. मुळे आपण खूप आनंदी राहाल. आणखी वाचा
धनु - श्रीगणेश सांगतात की आज आर्थिक लाभाचा दिवस आहे. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. नोकरदारांना नोकरीत लाभ आणि सहकार्यांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा
मकर - आज आपले मन चिंताग्रस्त व द्विधा अवस्थेत राहील असे श्रीगणेश सांगतात. या मनःस्थितीत कोणत्याही कामात खंबीर पणे निर्णय घेऊ शकणार नाही. दैव अनुकूल नसल्याने आज कोणतेही महत्वपूर्ण काम करू नका. आणखी वाचा
कुंभ- आज मानसिक तणावामुळे ग्रासून जाल. धनप्राप्ती संबंधी योजना आखाल. स्त्रीयांचा अलंकार, वस्त्र, सौंदर्य प्रसाधने यांवर पैसा खर्च होईल. मातेकडून लाभाची शक्यता. आणखी वाचा
मीन- श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस शुभ फलदायक जाईल. आपली कलात्मक व सृजनात्मक क्षमता वाढेल. वैचारिक स्थिरता आल्याने सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस शुभ आहे. आणखी वाचा