राशीभविष्य - ५ मे २०२२: आर्थिक आवक चांगली राहील, मात्र व्यवहार जपून करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 07:18 IST2022-05-05T07:18:13+5:302022-05-05T07:18:26+5:30
Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

राशीभविष्य - ५ मे २०२२: आर्थिक आवक चांगली राहील, मात्र व्यवहार जपून करा
मेष- काहींना प्रवास घडून येतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. भावंडांच्या नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळे होईल. जीवनसाथीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. वडीलधाऱ्या मंडळीचे म्हणणं ऐकून घ्या
वृषभ- धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. विविध प्रकारचे फायदे होतील. भेटवस्तू मिळतील. लोकांची साथ राहील. चांगल्या लोकांचे सर्वतोपरी सहकार्य व सल्ला मिळेल. नोकरीत थोडेसे संयमाने वागणे आवश्यक आहे. जीवनसाथीच्या कलाने घ्या
मिथुन – महत्त्वाच्या कामात यश मिळेल. अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. मुलांशी संवाद साधा. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध राहतील. एखादा व्यवहार लांबणीवर पडू शकतो.
कर्क- संमिश्र ग्रहमान राहील. काही कामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र संयम ठेवलेला बरा. काही कारणाने प्रवास करावा लागेल. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात अडचणी येऊ शकतात. वाहने जपून चालवा. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल.
सिंह- आपली कामे सहजतेने होतील. आर्थिक आवक चांगली राहील. अनेक प्रकारचे लाभ होतील. उत्तम प्रवास घडून येतील. बोलताना थोडे शब्द जपून वापरा. मुलांच्या भवितव्याची चिंता वाटेल. त्यांच्याशी बोलून मार्ग काढता येईल.
कन्या- उत्साहवर्धक वातावरण राहील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. नवीन संधी मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. जुने येणे वसूल करण्यात वेळ जाईल. घरी पाहुणे येतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मनातील अढी काढून टाका.
तूळ- अतिशय अनुकूल ग्रहमान राहील. भाग्याची चांगली साथ मिळेल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. प्रसिद्धी, मानमरातब मिळेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. तुमची प्रशंसा होईल.
वृश्चिक- महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ नये म्हणून काळजी घ्या. अडचणी आल्या तर संयमाने वागा. आतातायीपणा करू नका. नोकरीत थोडा तणाव राहील. एखादी चांगली बातमी मिळेल. प्रवास शक्यतो टाळलेला बरा. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील.
धनू- नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. काहींना पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील. मोठ्या प्रकल्पात तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. जीवनसाथीशी सूर जुळतील.
मकर- आर्थिक आवक चांगली राहील. मात्र आर्थिक व्यवहार जपून करा. उसने पैसे देताना विचार करून द्या. कुणी तुम्हाला अडचणीत आणणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायात बरकत राहील. प्रवास शक्यतो टाळा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील.
कुंभ- नोकरीत कामाचा ताण राहील. तुमचे संभाषणचातुर्य कामी येईल. जीवनसाथीशी वाद टाळणे योग्य ठरेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. त्यांचे कौतुक होईल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे.
मीन- नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल. ज्यांनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या आहेत त्यांना बोलावणे येईल. व्यवसायात तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. आवडत्या छंदासाठी वेळ काढा.
-विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)