Horoscope - 13 February 2021, more likely to succeed in business today | राशीभविष्य - १३ फेब्रुवारी २०२१, व्यवसाय धंद्यात आज यश मिळण्याची शक्यता अधिक

राशीभविष्य - १३ फेब्रुवारी २०२१, व्यवसाय धंद्यात आज यश मिळण्याची शक्यता अधिक

मेष - आजचा आपला दिवस मित्र आणि सामाजिक कार्ये यांच्यामागे धावपळ करण्यात जाईल. पैसाही खर्च होईल. नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे सफल होतील. मोठयांचा सहवास लाभेल, त्यांना भेटून आनंद होईल. आाणखी वाचा 

वृषभ -  आजचा दिवस शुभफले देणारा आहे असे श्रीगणेश सांगतात. विशेषतः धंदाव्यवसाय करण्यार्‍यांना आज फारच लाभदायक दिवस आहे. पदोन्नतीचा योगही आहे. कार्यलयात अधिकार्‍यांकडून सहकार्य मिळेल. आणखी वाचा 

मिथून - आपल्याला आज प्रतिकूल दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. मानसिक व्यग्रता, शारीरिक शिथिलता अनुभवास येईल. काम करायला उत्साह वाटणार नाही. व्यवसाय क्षेत्रात अधिकारी व सहकारी नकारात्मक वागतील. पैसा खर्च होईल. आणखी वाचा 

कर्क - वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर अस्वस्थ राहाल. म्हणून तो दूर ठेवा असे श्रीगणेश सांगतात. रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांबरोबर संघर्ष होणार नाही याकडे लक्ष द्या. आज नवीन कामे सुरू करू नका. आणखी वाचा 

सिंह - आज पति-पत्नींचे एकमेकांशी पटणार नाही. बेबनाव होईल, त्यामुळे क्लेश होतील असे श्रीगणेश सुचवितात. दोधापैकी एकाचे स्वास्थ्य बिघडणार नाही याकडे लक्ष द्या. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे मन उदास राहील. सामाजिक क्षेत्रात अपयश येणार नाही याकडे लक्ष द्या. आणखी वाचा 

कन्या - व्यवसाय धंद्यात आज यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. सहकार्‍यांचे सहकार्य वाढेल. कुटुंबातील वातावरण सुखाचे असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा 

तूळ - तुमची वैचारिक आणि मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व तसेच त्यामुळे इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील. चर्चा- वादविवाद यात ही तुमचा प्रभाव राहील. कष्टाच्या मानाने यश संतोषजनक नसेल. कामात सांभाळूनच पुढे चला. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. आणखी वाचा 

वृश्चिक - मित्रपरिवाराशी सावधपणाने वागा असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील. मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते. धन आणि किर्तीची हानी होईल. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील. आणखी वाचा

धनू - प्रतिस्पर्ध्यांवर तुम्ही मात कराल असे श्रीगणेश म्हणतात. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज चांगले राहील. नवीन कामाची सुरूवात करण्याला अनुकूल दिवस. मित्रांबरोबर दिवस आनंदात घालवाल. आध्यात्मिक आनंदही आज आपल्या जीवनात भरून राहील. आणखी वाचा

मकर - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मिश्रफल देणारा आहे. कुटुंबातील लोकांबरोबर गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग गडतील. व मन दुःखी होईल. विनाकारण खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना आज अभ्यासात रस वाटणार नाही. शेअर्स मध्ये गुंतवणूक करू शकाल. आणखी वाचा 

कुंभ - श्रीगणेश म्हणतात की आजचा दिवस तुम्हाला आर्थिक दृष्ट्या लाभदायी आहे. परिवारात आनंदी वातावरण असेल. मित्र आणि कुटुंबीय यांच्याबरोबर आनंदात दिवस घालवाल. प्रवास, सहली यातूनही आज आनंद मिळवू शकता. आणखी वाचा 

मीन -  स्थावर संपत्ती व कोर्ट- कचेरी याच्या झंझट मध्ये आज पडू नका असा सल्ला आज श्रीगणेश तुम्हाला देत आहेत. मनाच्या एकाग्रतेमुळे सर्व कामात फायदा होईल. तब्येत सांभाळा. स्वीकायांचा वियोग घडू शकतो. कुटुंबातील लोकांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Horoscope - 13 February 2021, more likely to succeed in business today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.