आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२२, व्यवहारात सावधानता बाळगा, कागदपत्रे वाचून सही करा, दक्ष राहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 08:05 IST2022-04-13T07:42:46+5:302022-04-13T08:05:40+5:30
Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या

आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२२, व्यवहारात सावधानता बाळगा, कागदपत्रे वाचून सही करा, दक्ष राहा
मेष - जनसंपर्क वाढेल, लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. त्यामुळे मन:शांती मिळेल. काहींना प्रवास करावा लागेल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. घरातील सदस्यांची काळजी वाटेल.
वृषभ - समाजसेवा करण्यात पुढाकार घ्याल. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. कागदपत्रे महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. वाहने जपून चालवा. कायद्याची बंधने पाळा. व्यवसायात विक्री चांगली राहील.
मिथुन - नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. चांगली संधी मिळेल. महत्त्वाच्या व्यक्ती भेटतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. जवळचे प्रवास होतील.
कर्क - आर्थिक आवक चांगली राहील. मोठ्या सौद्यामध्ये फायदा होईल. तुमचे आडाखे बरोबर ठरतील. मात्र, उसने पैसे देताना विचार करून द्या. कागदपत्रे वाचून सही करा. व्यवसायात बरकत राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल.
सिंह - कामात व्यस्त राहाल. कामाचा झपाटा विलक्षण राहील. तुमचे म्हणणे लोकांना पटेल. पर्यटनाच्या निमित्ताने, घरगुती कामाच्या निमित्ताने प्रवास होईल. मनात आनंदी विचार राहतील, महत्त्वाच्या कामात यश मिळेल. लोकांच्या भेटीगाठी होतील.
कन्या - एखाद्या कामात अडथळा येऊ शकतो. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. आरोग्याची काळजी घ्या. आराम करणे आवश्यक आहे. मनाचे संतुलन बिघडू देऊ नका. प्रत्येक परिस्थितीत संयम ठेवा. ऐकावे जनाचे करावे मनाचे यावर विश्वास ठेवा.
तूळ - अपेक्षित संधी मिळतील. नवीन माहिती कळेल. एखाद्या नवीन कार्यक्षेत्राशी परिचय होईल. महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील. व्यवसायात विक्री चांगली राहील. प्रवास कार्यसाधक ठरतील. मित्रांच्या भेटीगाठी होतील. मनात आनंदी विचार राहतील.
वृश्चिक - तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. लोकांच्या संपर्कात याल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जुन्या मित्रांच्या संगतीत मजेत वेळ जाईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. कामात उत्साह राहील, आशावादी राहाल.
धनू - अनुकूल घटना घडतील. मनात आनंदी विचार राहतील. आवडत्या छंदासाठी वेळ देता येईल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. विविध प्रकारचे लाभ होतील. नवीन संधी मिळतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे.
मकर - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र कुठल्याही व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे वाचून सही करा. कुणी तुम्हाला मोहात पाडण्याचा प्रयत्न करेल. दक्ष राहा.
कुंभ - मनात सकारात्मक विचार राहतील. समाजसेवा करण्यासाठी पुढाकार घ्याल. धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. लोकांच्या भेटीगाठी होतील, जनसंपर्क वाढेल.
मीन - नोकरीत कामाचा ताण कमी होईल. कामाचे सुयोग्य नियोजन करा. लोकांशी सौहार्दाचे संबंध राहतील. मनावरील ताण निघून जाईल. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. वाहने जपून चालवा. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.