शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही लष्करातील जवानाला विवस्त्र करून का मारलं?’’, राज्यवर्धन सिंह राठोड पोलिसांवर संतापले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 12:07 IST

Rajyavardhan Singh Rathore: तुम्ही लष्कराच्या जवानाला विवस्त्र करून का मारलं? तुम्ही लष्कराच्या जवानासोबत असं वागत असाल तर जनतेसोबत तुमची वागणूक कशी असेल, याची कल्पनाच केलेली बरी, असे राज्यवर्धन सिंह राठोड यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सुनावले.

राजस्थानमधील जयपूर येथील शिप्रापथ पोलीस ठाण्यामध्ये लष्करातील एका जवानाला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचं प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. या मारहाणीच्या घटनेवरून राजस्थान सरकारमधील सैनिक कल्याण मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आणि एसीपी संजय शर्मा यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली. या घटनेचा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राज्यवर्धन सिंह राठोड हे खूप संतप्त झालेले दिसत आहेत. तसेच त्यांची एसीपी संजय शर्मा यांच्यासोबत जोरात वाद घालताना दिसत आहे.  

ही घटना शिप्रापथ पोलीस ठाण्यामध्ये घडली होती. तिथे पॅरा कमांडो अरविंद सिंह राजपूत यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी कथितपणे मारहाण केल्याचा आरोप  होत आहे. या मारहाणीप्रकरणी जाब विचारण्यासाठी सैनिक कल्याणमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी शिप्रापथ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राज्यवर्धन सिंह राठोड हे एसीपी संजय शर्मा यांच्यासोबत सक्त भाषेमध्ये बोलताना दिसत आहेत. संजयजी तुम्ही लष्कराच्या जवानाला विवस्त्र करून का मारलं? तुम्ही लष्कराच्या जवानासोबत असं वागत असाल तर जनतेसोबत तुमची वागणूक कशी असेल, याची कल्पनाच केलेली बरी. मी तुमच्यासोबत बोलतोय आणि तुम्ही तिथे कुणासोबत बोलताय. मी इथे खूप धैर्याने बसलो आहे. जेव्हा तुमच्याशी बोललं जाईल, तेव्हा बोला, अन्यथा सावधान स्थितीत राहा. तुम्ही सामान्य शिस्तही शिकली नाही का? की गणवेशाचा वेगळाच रुबाब निर्माण झालाय? इथे दादागिरी सुरू आहे का? अशा शब्दात राठोड यांनी एसीपी महोदयांना सुनावले.  

मिळालेल्या माहितीनुसार शिप्रापथ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी एखा हुक्का बारवर कारवाई केली होती. त्यादम्यान त्यांनी लष्कराच्या एका जवानालाही ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्या जवानाचा जामीन देण्यासाठी आलेले जवान अरविंद सिंह यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर या जवानाला पोलिसांनी विवस्त्र करून मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी राज्यवर्धन सिंह राठोड यांनी डीजीपींना फोन करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानIndian Armyभारतीय जवानPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी