शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

'RSS आणि BJP लोकांना भडकवतात अन् दंगली घडवतात', अशोक गहलोत यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 17:10 IST

काँग्रेस सत्तेत आल्यावर द्वेष पसरवणाऱ्या संघटनांवर बंदी घालू- कमलनाथ

Rajasthan Politics: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बुधवारी RSS आणि भाजपवर मोठा आरोप केला. जालोर सर्किट हाऊस येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भाजप आणि RSS दंगली घडवतात. धर्माच्या नावाखाली ते लोकांना भडकवतात. भाजपवाले गायीचे राजकारण करतात, आम्ही गायींच्या नावावर कधीच मत मागत नाही. मग आम्ही हिंदू नाहीत का?, असा सवाल त्यांनी केला.

अशोक गेहलोत पुढे म्हणाले की, राममंदिराच्या राजकारणासाठी काही लोक हिंदू झाले आहेत, असे ते म्हणतात. मूळात त्यांचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नव्हता. हिंदू धर्म न मानणारे लोक राजकारणासाठी हिंदू झाले. राजस्थानमध्ये आम्ही भाजपचा हा हुंदुत्वाचा अजेंडा चालू देणार नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

काँग्रेस सत्तेत आल्यावर त्या संघटनांवर बंदी घालणार-कमलनाथतिकडे, मध्य प्रदेशकाँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी बजरंग दलावरील बंदीबाबत वक्तव्य केले आहे. शाजापूरमध्ये कमलनाथ म्हणाले की, मध्य प्रदेशात द्वेष पसरवणाऱ्या कोणत्याही पक्षावर बंदी घालू. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. बजरंग दल असो वा अन्य कोणताही पक्ष. जो कोणी समाज आणि देशामध्ये फूट पाडण्याचे आणि द्वेष पसरवण्याचे काम करेल, काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर त्या संघटनेवर बंदी घालेल.

इंदूरमधील बजरंग दलावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे आम्ही समर्थन करतो. पण, काँग्रेसच्या सांगण्यावरुन पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्ष बजरंग दलाच्या विरोधात नाही, पण जे राज्याची शांतता बिघडवतात किंवा द्वेष पसरवतात, त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ